?️Mollywood…सैराट चित्रपटातील ह्या अभिनेत्याचे न्यूड फोटो शूट…!पहाल तर धक्काच बसेल..!
हिंदी चित्रपट सृष्टी प्रमाणेच आता मराठी चित्रपट सृष्टी Mollywood.. देखील सतत सोशल मिडिया वर विविध कारणांसाठी चर्चेत असते.आधुनिक काळातील मराठी अभिनेते हे विविध कारणांमुळे चर्चेत राहतात.आता सैराट फेम तानाजीचा एक फोटो सोशल मिडिया वर व्हायरल झाला आहे.2016 मध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या सैराट चित्रपटाने मराठी चित्रपटांच्या इतिहासात अभूतपूर्व यश मिळवलं. या चित्रपटाच्या कथे बरोबरच गाणी देखील मोठ्या प्रमाणात गाजली. गाणी, कथानक आणि मांडणी याचबरोबरच चित्रपटातील कलाकारांच्या अभिनय देखील उत्कृष्ट होता. या चित्रपटामधून आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरु, परश्याची भूमिका साकारणारा आकाश ठोसर आणि परश्याच्या मित्रांच्या भूमिकेतील अरबाज शेठ, तानाजी गालगुंडे हे चौघेही प्रचंड लोकप्रिय झाले. या चौघांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. या चित्रपटात ‘लंगड्या’ची भूमिका साकारणारा तानाजी आता पुन्हा चर्चेत आलाय आणि तो ही चक्क न्यूड फोटो शूटमुळे.
बसला की नाही धक्का पण हे खरं आहे. तानाजीचा एक फोटो नुकताच समोर आला असून यामध्ये तो न्यूड म्हणजेच नग्नावस्थेत दिसून येत आहे. रावण प्रोडक्शनच्या एका विशेष कॅलेंडरसाठी तानाजीने हे फोटोशूट केलं आहे. फोटोमध्ये तानाजीने हातात गिटार पकडली आहे. सैराटमध्ये ग्रामीण भागामधील एका हुल्लड पोराची भूमिका साकारणाऱ्या तानाजीचा हा बोल्ड अंदाज पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. पॉझिटिव्ह बॉडी म्हणजे शारीरिक व्यंग असणाऱ्यांकडे पॉझिटिव्ह दृष्टीकोनाने पाहण्याची गरज आहे असं सांगणारा “पॉझिटीव्ह बॉडी” हा विचार घेऊन हे फोटोशूट करण्यात आलं आहे. या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये तानाजीचं एक वाक्य वापरण्यात आलं आहे. “माझे पायांची रचना योग्य नाहीय पण माझं उत्तम शरीर नक्कीच आहे.अशा आशयाचा संदेश असणारी ओळ शेअर करण्यात आलीय. प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजर नेरुरकरने हा फोटो काढलाय.
काही दिवसांपूर्वी हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरातनेही याच कॅलेंडरसाठी अशाच पद्धतीचं न्यूड फोटोशूट केलेलं. त्यावरुन सोशल नेटवर्किंगवर चांगलीच चर्चा रंगल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. वनितानेही बॉडी शेमिंग करणाऱ्या, शरीराच्या रचनेवरुन हिणवणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी हे फोटोशूट केलेलं. वनिताच्या या बोल्ड फोटोशूटमधून चाहत्यांमध्ये मतमतांतरे पहायला मिळाली. मात्र वनिताने आपल्या या बोल्ड फोटोशूटचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं होतं. वनिताप्रमाणेच आता त्याच थीमवर आधारित फोटोशूट तानाजीने केल्याचं पहायला मिळतंय.वेगवेगळे ट्रेंड मराठी चित्रपट सृष्टी त पाहावयास मिळत आहेत.






