शिवरत्न ज्युनिअर कॉलेज गादेगाव यांच्यावतीने मनसेचे सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे यांनी सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर तालुक्यामधील गादेगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे यांनी कोरोणाच्या काळात सामाजिक बांधिलकी जोपासत गोरगरीबांना वंचितांना आर्थिक मदत, त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंची मदत केल्याबद्दल शिवरत्न ज्युनिअर कॉलेज गादेगाव. यांच्यावतीने दिलीप बापू धोत्रे यांचा सन्मान चिन्ह व मानाचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. गेले चार महिन्यापासून मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे यांनी जनतेसाठी गोरगरिबांसाठी कौतुकास्पद उपक्रम राबवले आहेत .सर्वसामान्यांना कोरणाच्या महामारी मध्ये दिलासा देण्याचे काम दिलीप बापू धोत्रे व त्यांच्या सर्व टीमने केले असून त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी अनिल आप्पा बागल, ग्रामपंचायत सदस्य गणेश बागल ,अजित मोरे, मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे, कृष्णा मासाळ ,राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते






