जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा…
आज दिनांक 18 डिसेंबर 2024 आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो, या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याचे कार्यक्रम हे जिल्हा नियोजन भवन येथे अप्पर जिल्हाधिकारी श्री गोगाटे यांच्या अध्यक्षतेत पार पडला,
या कार्यक्रमात मंचवर जिल्हा नियोजन अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक, व माध्यमिक, अप्पर पोलीस अधीक्षक हे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते, तसेच विविध खाजगी व शासकीय शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, अल्पसंख्यांक संगठनेचे पदाधिकारी, पत्रकार तसेच शाळेचे विध्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात एम आई एम पक्षाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष सैय्यद रफअत हुसैन, डीएड कॉलेज चे प्राध्यापक मेहमूद खाटीक, अल्पसंख्यांक फॉउंडेशन चे आरिफ शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना अल्पसंख्यांकांशी निगडित अनेक प्रश्न उपस्थित केले व सदर प्रश्नांना मार्गी लावन्यास प्रशासन स्तरावर उदासीनते बद्दल ही खंत व्यक्त करण्यात आली.
यात विविध स्पर्धेत भाग घेतलेले शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनींना बक्षीसही वितरित करण्यात आले.






