व्हॉट्सअप ग्रुपवर इस्लाम विरोधी खोटा इतिहास व प्रेषित मोहंमद साहेबांचा अपमानजनक विडियो प्रसारीत करणारा समाजकंटकावर कडक कारवाई करा एम आय एम कडुन जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
फहिम शेख नंदुरबार
नंदुरबार : पंचायत समिती नंदुरबार येथे बांधकाम विभागात नोकरी करणाऱ्या भरत पाटील नामक समाज कंटकाने १२ जून २०२१ रोजी सोशल मीडीया च्या व्हॉट्सअप वर ‘महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी ग्रुप नं.२’ या नावाच्या ग्रुपवर एक विडियो प्रसारित केला.
त्यात इस्लाम विरोधी खोटा इतिहास सांगणारा भडकाऊ मजकूर व प्रेषित मोहम्मद साहेबांचा अपमानजनक एकेरी उल्लेख केले आहे ज्यात मुस्लिमांची धार्मिक भावना दुखावणारा व इतर समाजांमध्ये इस्लाम व मुस्लिमांबद्दल व्देष निर्माण करून धार्मिक तेड निर्माण करणारा मजकुर सदर व्यक्तीने त्याच्या मोबाइल वरून महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद ग्रुप क्रमांक दोन या ग्रुप मध्ये प्रसारित केला असून त्या भडकाऊ विडियोला प्रीतम महाजन नामक ग्रुप सदस्यने लाईक केला आहे.
सदर या घटनेमुळे संपुर्ण मुस्लिम समाजाची धार्मिक भावना दुखावली गेली असुन लोक संतापले आहे.
या समाजकंटका विरुद्ध प्रचलित कलमानुसार गुन्हा दाखल होऊन त्वरीत कार्यवाही करण्यात येऊन सरकारी नोकरीतून बडतर्फ करण्यात यावे.
मुस्लिम समाजाची भावनांचा गंभीरतेने विचार होऊन कार्यवाहीचे आदेश करावे अशा तक्रारी निवेदन एम आय एम जिल्हा अध्यक्ष सैय्यद रफअत हुसैन यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.
यावेळी शोएब खाटिक, हफीज अब्दाल, आरिफ सैय्यद, मुख्तार मिर्जा, साजिद पिंजारी, आबीद शेख, सिद्दीक पिंजारी, रिजवान खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आश्वासन दिले की संबंधित समाज कंटकांवर कार्यवाही केली जाइल.






