मकरंद साठे यानां शिवसेनेकङून विधान परिषदेवर संधी द्यावी
यूवा क्रांती सेना सामाजिक संघटनेची मागणी
कोल्हापूरःआनिल पाटील
खूङूस (ता. माळशिरस जि. सोलापूर ) येथील सामाजिक कार्यकर्ते व यूवा क्रांती सेना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मकरंद नागनाथ साठे यानां शिवसेना पक्षाने विधानपरिषदेच्या सदस्यपदी निवङ करावी अशी मागणी यूवा क्रांती सेना सामाजिक संघटनेने राज्याचे मूख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकङे एका निवेदनाद्वारे केली आहे.
राज्याच्या विधान परिषदेमध्ये 12 जागा रिक्त झाल्या आहेत. त्यापॅकी चार जागा शिवसेना पक्षाला आल्या आहेत. यामध्ये मातंग समाजाला मकरंद साठे यांच्या रूपाने आमदारकीची संधी द्यावी. मकरंद साठे यांनी लोकांच्या जनहितासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलनात सहभाग घेवून त्यांनी लोकानां न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्य काळापासून ते आजतागायत मातंग समाज शिवसेना पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीला आहे. कधीही हा समाज इतर पक्षाच्या दावणीला बांधला गेला नाही. कधी ही या समाजाला विधानपरिषदेवरती संधी दिली गेली नाही. या वर्षी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने मातंग समाजाच्या कार्यकत्यास मकरंद साठे या कार्यकत्यास शिवसेनेने संधी दिल्यास राज्यात शिवसेनेची ताकद वाढेल असे ही या निवेदनात म्हणटले आहे.






