Maharashtra

एक विद्यार्थी- पाच वृक्ष अनिवार्य करा

एक विद्यार्थी- पाच वृक्ष अनिवार्य करा

वृक्ष संवर्धन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र द्यावे
वसुंधरा प्रतिष्ठानचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

लातूर प्रतिनिधीं :-प्रशांत नेटके

ठोस प्रहार वृत्तसेवा:- कोरोना या महामारिच्या पार्श्वभूमीवर सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पास केले आहे. या निर्णयाचे लातूर येथील वसुंधरा प्रतिष्ठानने स्वागत केले असून प्रत्येक विद्यार्थ्यांला किमान ५ वृक्ष लावून संवर्धन केल्याशिवाय डिग्री (प्रमाणपत्र) देऊ नये, अशी मागणी वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा आणि प्रतिष्ठानचे कायदेविषयक सल्लागार अजित चिखलीकर यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,
सद्यस्थितीत बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिंगची समस्या निर्माण होत आहे. शिवाय पाऊसमानावर त्याचा विपरीत परिणाम होत मानवी जीवनावर होत आहे. त्यामुळे वृक्ष लागवड करून निसर्गाचे संवर्धन करणे आज काळाची गरज आहे. राज्यात शासनामार्फत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होते. यंदा कोरोनाच्या स्थितीतही वृक्ष लागवड आणि संगोपन कार्य हाती घेण्याची गरज आहे. राज्यभरातील सर्वच विद्यार्थ्यांना आपण परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय या काळात गरजेचाही होता. मात्र, राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना किमान ५ वृक्ष लावणे आणि संगोपन करणे अनिवार्य करावे, अशी मागणी केली आहे. तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात शिक्षण खाते, सर्व विद्यापीठ यांना आदेशित करावे. अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन ई-मेल द्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री, पर्यावरण मंत्री, पालकमंत्री यांना पाठविण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button