महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटने तर्फे सावदा येथे उर्दू आदर्श शिक्षिक पुरस्कार कार्यक्रम संपन्न जिल्ह्यातील ३७ शिक्षक उर्दू आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
युसूफ शाह सावदा
सावदा : सावदा ता.रावेर जिल्हा जळगाव येथील मस्कावद रोड वरील असलेले हाजी इक्बाल हुसैन हाल मध्ये आज दि १४ फेब्रुवारी २०२१ रोजी जळगाव जिल्हा स्तरीय उर्दू आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष आ,शिरीषदादा चौधरी होत या वेळी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल देश-विदेशात विविध पुरस्कारांनी सन्मानित महिला डॉ, पाकीजा उस्मान पटेल, डॉ, उस्मान फकीरा पटेल ग, स सोसायटी चे माजी अध्यक्ष तुकाराम बोरोले सर म,रा उर्दू शिक्षक संघटनेचे संस्थापक एम, ए,गफ्फार,डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष हाजी हारून सेठ, राष्ट्रवादी नगर सेवक व विरोधि गटनेते फिरोज खान पठाण ,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सैय्यद असगर रावेर प,स चे गट शिक्षण अधिकारी, म,रा उर्दू शिक्षक संघटनेचे जळगांव जिल्हा अध्यक्ष नफीस अहमद, इरफान सेठ चिनावल आदी मान्यवर उपस्थित होते
प्रथम कार्यक्रमाच्या सुरुवातीला,मेहबूब सर यांनी ईश्वरचरणी प्रार्थना व नात पठण केली ,तसेच न ,पा उर्दू शाळेच्या ५ लहान मुलींनी स्वागत गीत म्हटले यानंतर हाजी हारुन शेठ व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचे महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले
या नंतर उर्दू शाळांतील शिक्षकांना कधीही जि,प जळगांव यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले नाही यासाठी आंदोलन सुद्धा करूनही उपयोग झाला नाही म्हणूनच उर्दू शाळांचे शिक्षकांना सन्मानित करण्या करिता व शिक्षण क्षेत्रात शिक्षक व विद्यार्थ्यांकरीता उत्कृष्ट कार्य करणे हा मुख्य हेतू समोर ठेवून आम्हास ही महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, निर्माण करावी लागली व आज हा कार्यक्रम आपण घेत आहोत असे प्रास्ताविक भाषण करत्या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नफीस अहमद यांनी सांगितले
या दरमियान ओरिजनल पत्रकार संघ सावदा चे सदस्य फरीद शेख, सावदा न ,पा उर्दू शाळेचे मुख्याध्यापक, इम्रान जनाब पत्रकार साजिद शेख,मसुद खान यांचे सुद्धा सत्कार करण्यात आले
या , कार्यक्रमात आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या शुभहस्ते जळगाव जिल्ह्यातील एकूण ३७ शिक्षकांना उर्दू आदर्श शिक्षक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले , त्यापैकी सावदा येथील अँग्लो उर्दू हायस्कूल चे शिक्षक अली हैदर खान अजमल खान ,शेख सईद शेख ताहेर, न ,पा उर्दू शाळेचे शिक्षक अर्शद शेख शब्बीर व शिक्षिका गजाला बी कमालुद्दीन यांना ही उर्दू आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार शिरीष दादा यांनी त्यावेळी आपले मनोगत व्यक्त केले की या माहिती व तंत्रज्ञानाच्या काळात शिक्षण क्षेत्रात आपले मुलांचा विकास व उन्नती करिता,जे करता येईल ते करा यासाठी मदत करण्यास मी सुद्धा तुमच्या सोबत आहे असे सांगीले यावेळी इतर मान्यवरांनी ही आपले अनमोल मनोगत व्यक्त केले
*विशेष*
मोहम्मद जरियान, या २ वर्षीय बालकचे डाव्या डोळ्यात कॅन्सर असून ,त्याचे उपचारासाठी आर्थिक मदत करावी असे मेहबूब सर यांनी आवाहन केल्याने कार्यक्रमात उपस्थित लोकांनी त्या मुलांना आर्थिक मदतीचा हात दिला
कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य उर्दू संघटनेचे जिल्हा विभागीय सचिव गौस खान सर,जिल्हा कार्याध्यक्ष अस्लम जनाब तालुकाध्यक्ष कमालुद्दीन जनाब यांच्यासह संघटनेचे ,सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले






