Loksabha Election 2024: Live: मा शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरू… टायगर अभी जिंदा है…
आता सध्या आ शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरू असून कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टाचं हे फळ आहे. संपूर्ण देशात या निकालांमुळे आशादायी चित्र दिसून येत आहे.10 जागांपैकी 7 जागांवर आघाडी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. महविकास आघाडी चे हे यश आहे. असेही ते म्हणाले. उद्या इंडिया ची बैठक महत्वाची असेल. काँग्रेस पक्ष श्रेष्ठी सोडून इतर कोणाशीही माझं बोलण झाल नाही. बारामती मधून सुप्रिया सुळे आघाडीवर आहे. माझा बारामतीच्या जनतेवर विश्वास आहे. माझ्या सहकाऱ्यांशी व कार्यकर्त्यांशी मी संपर्कात आहे. हे एकट्याच यश नसून इंडिया च यश आहे. हा विजय प्रेरणादायी असून राष्ट्रीय पातळीवर महत्वाचा भाग आहे.225 पेक्षा अधिक जागा महविकास आघाडीला मिळणार.






