महाराष्ट्र राज्यातील पहिला निकाल जाहीर झाला असून काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी विजयी, भाजपाच्या हिना गावीत पराभूत झाल्या आहेत. जनतेने योग्य कौल देत हिना गावीत यांना मोठा धक्का दिला आहे. तर जळगाव मतदारसंघातून पहिल्या महिला खासदार स्मिताताई वाघ ह्या प्रचंड फरकाने 2,57, 858 मतांनी विजयी झाल्या आहेत. अमळनेर तालुक्यासाठी ही अत्यंत अभिमानाची व गौरवाची बाब असून आदरणीय स्मिताताई यांची पक्षनिष्ठा आणि जन सामन्यात असलेली लोकप्रियता कामी आली असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. अमळनेर तालुक्यातून भारतीय जनता पक्षाला कधीही मतदान न करणाऱ्या जनतेने, लोकांनी देखील फक्त खासदार स्मिताताई वाघ यांना व्यक्ती पाहून मतदान केले आहे. अश्या भावना अनेक मतदारांनी व्यक्त केल्या आहेत.आणि योग्य उमेदवार असल्यास पक्ष महत्वाचा ठरत नाही याचे उदा देखील घालून दिले आहे. खासदार स्मिताताई वाघ यांना राज्यातून सर्वात मोठ्या लीड ने निवडून आल्या आहेत.याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातून उध्दव ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गट आणि इतर हे आघाडीवर असून जनतेने गद्दारांना योग्य जागा दाखविल्याच्या जनतेतून व्यक्त केल्या जात आहेत. महाराष्ट्रात भाजप ला एकूण २९ जागांवर नुकसान झाले आहे.
स्मिता वाघ – 7,04,197.
करण पवार – 4,46,339.
विजयी आघाडी :
राजाभाऊ वाजे (शिवसेना, नाशिक)
प्रतिभा धानोरकर (काँग्रेस, चंद्रपूर)
प्रतापराव जाधव (बुलढाणा)
रक्षा खडसे (भाजप, रावेर)
स्मिता वाघ (भाजप, जळगाव)
श्रीकांत शिंदे (शिंदेसेना, कल्याण)
विशाल पाटील (काँग्रेस, सांगली)






