LonandMaharashtra

लोणंद नगरपंचायत उपनगराध्यक्ष किरण पवार यांच्यावर अविश्वास ठराव प्रस्ताव बारगळला

लोणंद नगरपंचायत उपनगराध्यक्ष किरण पवार यांच्यावर अविश्वास ठराव प्रस्ताव बारगळला

दिलीप वाघमारे

लोणंद शहरातील विद्यमान नगरपंचायत उपनगराध्यक्ष किरण पवार यांच्यावरचा अविश्वास प्रस्ताव मोठ्या फरकाने आज रोजी फेटाळण्यात आला त्यामुळे विद्यमान उपनगराध्यक्षपद अबाधित पवार यांच्या कडे राहिले किरण पवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या बारा नगरसेवकांनी आपल्या सह्यांचे यांचे पत्र देऊन अविश्वास प्रस्ताव 6 मार्च रोजी दाखल केला होता आज दिनांक 16 मार्च रोजी त्यावर नगरपंचायतीच्या हॉलमध्ये मतदान घेऊन पवार यांनी यावेळी अचानक बाजीगर ठरले पवार यांच्या बाजूने तेरा नगरसेवकांनी तयार करून मतदान केले तर विरोधक नगरसेवक पुरुषोत्तम हिंगमिरे यांनी विरोधात मतदान केले आणि शहरात सुरु असलेली चर्चेला पूर्णविराम मिळाला.

मतदान सुरू असताना तीन नगरसेवक गैर हजर होते त्यामुळे नगरपंचायतीच्या नाट्यमय घडामोडीत उपनगराध्यक्ष किरण पवार यांचे उपनगराध्यक्षपदी जाणार की राहणार या चर्चेला उधाण आले होते.

मात्र पडद्यामागे अशा काही घटना घडल्या की बारा जणांचे सह्या चे पत्र देऊन अविश्वास दाखल केला होता. तरीही किरण पवार यांच्या विकासामुळे पुन्हा एकदा मोठ्या फरकाने बाजी मारली. त्यामुळे शहरातील चौकाचौकात पैजा लागल्या होत्या आणि नाट्यमय घडामोडी नांदी असल्याचे अनेक जाणकार नगरसेवकांनी मत व्यक्त केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button