Nashik

समाजाचे प्रश्न माडणारे साहित्य चिरकाल टिकते- कवी अमोल बागुल

समाजाचे प्रश्न माडणारे साहित्य चिरकाल टिकते- कवी अमोल बागुल

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी

दिंडोरी प्रतिनिधी – समाजाचे प्रश्न मांडणारे साहित्यि चिरकाल टिकते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अमोल बागुल यांनी केले.दिंडोरी तालुका सांस्कृतिक मंच व परिवर्त बहुउद्देशीय संस्था,नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी येथे पहिले एक दिवसीय परिवर्त ग्रामीण साहित्य संमेलन रविवार दि.8 जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाले, या संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.संमेलनाचे उद्घाटन कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते पिंपळाच्या रोपास पाणी अर्पण करून करण्यात आले.याप्रसंगी मान्यवरांच्या उस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज,भारत रत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी संमेलनाध्यक्ष कवी अमोल बागुल,उद्घाटनसत्र अध्यक्ष तथा दिंडोरी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष लताताई बोरस्ते,युवा नेते गोकुळ झिरवाळ,स्वागताध्यक्ष नितीन भुजबळ,संयोजन समिती अध्यक्ष तुषार वाघ,प्रमुख कार्यवाह प्रा.गंगाधर आहिरे,मविप्र चे दिंडोरी पेठ तालुका संचालक प्रविननाना जाधव, दिंडोरी कृषीउत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख,सहायक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे,नायब तहसीलदार शीतल राठोड,प्राचार्य रमेश वडजे,ज्येष्ठ नेते बाळासाहेब जाधव, नंदुदादा सोमवंशी, चंद्रकांत राजे, कैलास मवाळ,आबासाहेब देशमुख, माजी सैनिक प्रकाश हारक, भारत खांदवे,रणजित देशमुख,नगरसेवक सुजित मुरकुटे, ॲड. प्रदीप घोरपडे, दिपक जाधव, वैभव महाले,रघुनाथ पाटिल, समाधान अपसुंदे, जयवंत जाधव, तुकाराम जोंधळे, माधवराव उगले, भास्कर भगरे, डॉ.योगेश गोसावी, शाम हिरे, नितिन भालेराव, निलेश गायकवाड, लक्ष्मण देशमुख,शंकर ठाकूर गुड्डू सैय्यद यांच्यासह मान्यवर उस्थितीत होते.उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना कवी इंद्रजित भालेराव म्हणाले की लेखक,कवी साहित्यिकांनी परिवर्तनवादी होणे आवश्यक आहे.भालेराव यांनी माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता,शिक बाबा शिक लढायला शिक आदी शेतकरी व्यथा मांडणाऱ्या कविता खास शैलीत सादर करून उस्थितांची मने जिंकली.संमेलनाच्या निमित्ताने दिंडोरी नगरपंचायत कार्यालय परिसर ते आदिवासी सांस्कृतिक भवन परिसरातील कर्मवीर रावसाहेब थोरात साहित्य नगरी पर्यंत भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली,यात दिंडोरी जनता विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक यांचे लेझिम पथक, मान्यवर, साहित्यिक,भजनी मंडळ आदी सहभागी झाले होते.दिवसभराच्या संमेलनात संविधानाचे अभ्यासक प्रा.यशवंत गोसावी यांचे भारतीय संविधान स्वरूप व सध्यस्तिथि या विषयावर तर प्रा.माधव खालकर यांचे शेती माती माणूस आणि साहित्य या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
सुप्रसिध्द रानकवी तुकाराम धांडे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन संपन्न झाले,यात कवी रवींद्र
मालुंजकर,राजेंद्र उगले,प्रशांत केंदले,राजेंद्र सोमवंशी यांच्यासह 30 पेक्षा अधिक कवींनी आपल्या कविता सादर केल्या.साहित्य संमेलनाच्या माध्यमातून दिंडोरी व परिसरातील साहित्य प्रेमी नागरिक शालेय विद्यार्थी लेखक कवी शिक्षक आदींना उत्तम साहित्यिक व सांस्कृतिक मेजवानी मिळाली.दिंडोरी तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या व्यक्तींना संमेलनात विविध पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.ज्येष्ठ कामगार नेते करुणा सागर पगारे ,कवी विजयकुमार मिठे यांना जीवनगौरव पुरस्कार,डॉ.यशवंत पाटील यांना साहित्यरत्न पुरस्कार,सदाशिव आप्पा शेळके यांना कृषीभूषण पुरस्कार, इंजि.उद्धव गांगुर्डे,सुभाष गांगुर्डे,यूपी मोरे यांना लोकसेवक पुरस्कार, आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे यांना क्रीडारत्न तर प्रतिक सोळसे यांना कलारत्न पूस्कार देण्यात आला. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून अधिकचे मार्गदर्शन करताना कवी अमोल बागुल म्हणालेकी दिंडोरी तालुक्यास सांस्कृतिक व साहित्यिक मोठी परंपरा आहे,साहित्यातून वैचारिक वारसा जपला पाहिजे,मराठी बोली मनाला भिडणारी आहे,मनात असणारी खदखद साहित्यातून व्यक्त झाली पाहिजे.संयोजन समितीचे अध्यक्ष तुषार वाघ यांनी प्रास्ताविक केले,प्रमुख कार्यवाह प्रा.गंगाधर
आहिरे यांनी संमेलनाची भूमिका मांडली. प्रा.डॉ.धीरज झालटे यांनी सूत्रसंचालन केले तर कार्याध्यक्ष राजेंद्र गांगुर्डे यांनी आभार मानले.संमेलन यशस्वी करण्यासाठी तुषार वाघ प्रा.गंगाधर आहिरे,नितीन भुजवळ,उपाध्यक्ष नितीन गांगुर्डे, कोषाध्यक्ष प्रा.डॉ.धीरज झाल्टे सचिव नितीन बागूल,संतोष कथार,अशोक निकम,बापू चव्हाण,प्राचार्य दिनकर पवार,कवी प्रदीप जाधव, प्रविण शार्दुल सर,भूषण बोरस्ते,विनोद देशमुख,डॉ.विलास देशमुख,युक्रांत पगारे,गोकुळ आव्हाड,राजेंद्र मोकळ,मोगल सर,आरती डिंगोरे,विद्रोही कवी संविधान गांगुर्डे,प्राचार्य रखमाजी सुपारे,कवी काशिनाथ वेलदोडे, जयवंत बोढारे,श्यामराव बागुल, अमोल गणोरे,सदाशिव वाघ, पवन देशमुख, अनंत चौधरी,मनोज पाटिल, कचरू पाटील, उमेश पगारे, वंदन बागुल, सुरेश बागुल, मदन बागुल,संविधान गांगुर्डे, संदिप गोतरणे, कैलास गायकवाड, शाम गवारे, संतोष आंबेकर, ॲड.एफ.डी.पठाण सागर पगारे, निशांत साळुंखे प्रशांत वडजे यांच्यासह संयोजन समितीतील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.या संमेलनात मित्रमंडळ सार्वजनिक वाचनालय दिंडोरी,अरुणोद‍्य सार्वजनिक वाचनालय दिंडोरी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय,कादवा शिवार परिवार,ज्येष्ठ नागरिक संघ,माजी सैनिक संघ,साक्षी प्रतिष्ठान, साहित्यगंध मंडळ कसबेवणी दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाचे समाधान पाटील, सुनिल घुमरे किशोर जाधव आदी पत्रकार बांधव व संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह दिंडोरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button