रावेर तालुक्यात कोरोनासह वादळाचा ही तडाखा
केळीचे लाखोंचे नुकसान, झाडेही उन्मळून पडली
सातपुडातील मोहमांडली येथे घरावरील पत्रे उडून घरांची पडझड होऊन संसारोपयोगी वस्तूंचेही नुकसान झाले
प्रतिनिधी मुबारक तडवी
अगोदरच कोरोना प्रादुर्भावामुळे भयभीत झालेले असतांनाच रावेर तालुक्यात आज दुपारी २ वाजेच्या सुमारास निंभोरा वडगाव, चिनावल तसेच विवरे या भागात जोरदार वारा, पाऊसासह वादळाचा तडाखा बसला असुन अंदाजे ५० लाखाचे केळीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सुत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.
तालुक्यातील काही गावांना आज दुपारी २ वाजता वारा,पाऊस व वादळाचा तडाखा बसल्यामुळे अंदाजे २०० हेक्टर वरील केळी पिक क्षेत्र बाधीत झाल्यामुळे या परिसरातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्याचे भरपूर नुकसान तसेच शेतातील झाडे विजेचे खांब व वीजतारा तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन अंकलेश्वर बुऱ्हाणपूर राज्य महामार्ग काहीकाळ दुतर्फा रस्ता हा झाडे पडल्यामुळे बंद झाला होता काही तासांतच रस्त्यावर उन्मळून पडलेली झाडे बाजूला सारून वाहतूक सुरळीत करण्यात आली आज रोजीच रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी दुर्गम भागातील मोजे नवी मोहमांडली येथे दुपारी 3:00 वाजता जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला.
जोरदार वादळी वाऱ्यामुळे श्री. अलियार शेरखा तडवी यांच्या घरातीलघराची पत्रे उडाली असून पत्राची नुकसान झालेली आहे.तसेच भिंत ,लाकडे व संसारोपयोगी वस्तूंची ही सुद्धा नुकसान झालेले आहे.
तरी शासनाने नुकसान झालेल्या केळी पिकाचे घरांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून वादळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यान कडुन होत आहे.
,






