Amalner

कै. सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालय चिमणपुरी पिंपळे येथे गरजू विद्यार्थ्यांना डॉ. श्री. अविनाश जोशी व डॉ. सुषमा जोशी यांच्यातर्फे गणवेश,मास्क व वह्याचे वाटप

कै. सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालय चिमणपुरी पिंपळे येथे गरजू विद्यार्थ्यांना हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्री. अविनाश जोशी ,डॉ. सुषमा जोशी यांच्यातर्फे गणवेश,मास्क व वह्याचे वाटप

अमळनेर : अमळनेर तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे बु. येथील कै. सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना गणवेश, मास्क व वह्या यांचे वाटप अमळनेरचे सुप्रसिध्द हृदयरोगतज्ज्ञ माननीय डॉ. श्री. अविनाश जोशी व त्यांच्या अर्धांगिनी डॉ. सुषमा जोशी यांच्या तर्फे करण्यात आले. डॉक्टरांची ओळख त्यांचा व्यवसायातील प्रामाणिकपणा व सामाजिक बांधिलकी अतुलनीय कौतुकास्पद असल्याचे दिसते. यावेळी पिंपळे ,आटाळे,आर्डी या गावातील सर्व शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाचे दाते डॉ. अविनाश जोशी, डॉ. सौ. सुषमा जोशी दाम्पत्य हे होते कार्यक्रमास विशेष उपस्थिती डी आर कन्या विद्यालयातीलउपशिक्षिका सौ. सीमा सूर्यवंशी,श्री योगेश पाटील, सदाबापु पाटील, युवराज पाटील हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली यानंतर शाळेचे मुख्याध्यापक यांनी माननीय डॉक्टर जोशी सर यांच्या कार्याचा परिचय करून दिला. पिंपळे बु. चे उपसरपंच योगेश दादा व आटाळे गावाचे माजी सरपंच सदा बापू यांनी लोकप्रतिनिधी म्हणून शब्दसुमनांनी आमच्या गावातील विद्यार्थ्यांना गणवेश दिल्याबद्दल डॉक्टरक्टरांचे आभार व्यक्त केले. यानंतर कार्यक्रमाचे दाते डॉ जोशी सर यांनी विद्यार्थ्यांना मेहनतीने अभ्यास केल्याने आयुष्यात यश निश्चित मिळते.असे बोधपर मार्गदर्शन केले. मनोगत व्यक्त करतांना डॉ. अविनाश जोशी यांनी अभ्यासात हुशार मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ज्यांना शिक्षण घेणे अशक्य होते अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही वेळोवेळी शक्य ती मदत करु असे आग्रहाने प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जगदीश पाटील सर तसेच आभार प्रदर्शन डी बी पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील मुख्याध्यापक श्री. एस.डी. सूर्यवंशी सर, यू.बी.पाटील, जे.एस.पाटील, डी.जे.पवार, योगेश जाधव व सौ रुपाली निकम मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button