लखमापूर (येरवा) गाव अजूनही अंधारातच
मनोज गोरे
चंद्रपूर जिल्हातील राजुरा मतदारसंघातील जिवती तालुक्यातीलभारी ग्रामपंचायत हद्दीतील लखमापूर या विकासापासून वंचित असलेल्या आदिवासी ग्रामीण भागात अद्याप वीज पुरवठा झाला नाही. १६ घरे १२० ते १५० लोकांची वस्ती असलेल्या या भागात गोंड समाजाचे लोक रहातात. सतत अंधारात राहून आमच्या गावात कधी वीज पुरवठा होणार असे वस्तीतील ८५ वर्षांच्या वृद्ध सांगत होती.
https://www.thosprahar.com/wp-content/uploads/2020/02/VID-20200212-WA0033-1.3gpया गावात मोबाइल पोहोचला तरी वीज मात्र अद्याप पोहचली नाही. या वस्तीतील विद्यार्थी शालेय शिक्षण घेत आहेत. या मुलांना केरोसिनच्या दिव्याखाली अभ्यास करावा लागतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारे अंधारामध्ये शिक्षणाचे धडे गिरवावे लागत असतील तर देशातील गावे स्मार्ट व्हिलेजकशी होणार हा एक प्रश्नच आहे. लखमापूर वस्तीवर अजूनही वीज पोहोचली नाही. या गावामध्ये मूलभूत सुविधा पोचणार की नाही? आपले संपूर्ण आयुष्य हे अंधारामध्येच काढावे लागणार की काय ह्याची चिंता समस्त ग्रमस्ताना भेडसावत आहे.
https://www.thosprahar.com/wp-content/uploads/2020/02/VID-20200212-WA0035-1.3gpतारा तूटुन, पोल पडून आहे.
हेच कारण सांगून विजेच्या समस्येकडे दुर्लक्ष केला जात आहे असा आरोप ग्रमस्तानी केला आहे. लखमापूर येथे वीज पुरवठा करून देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्तानी केली आहे. देश स्वतंत्र होऊन सुद्धा ह्या गावात वीज पोहचली नसल्याने शोकांतिका व्यक्त केली जात आहे.
एकदा नव्हे; तर तीनदा सर्व्हे होऊन काहीच झाले नाही. अनेक वेळा अर्ज करूनही गावात वीज आली नाही. गांव तीस वर्षांपासून अंधारातच आहे. मात्र नव्या पिढीला तरी प्रकाश मिळावा ही अपेक्षा गावातील नागरिकांनी वर्तविली आहे.
मराईपाटण लखमापूर या गावात कनेक्शन घेण्यासाठी पोल व लाईन घेण्यात आली परंतु पहाडी व जंगलातुन लाईन गेल्याने काही खांबे/पोल पडलेले व वाकलेले आहे. त्यामुळे विज पुरवठा शक्य नव्हता. म्हणून नवीन लाईन येरवा ते लखमापूर अशी कनेक्शन प्रपोजल पाठवून ती मंजूर झालेले आहे व टेंडरला सुध्दा टाकली आहे. ती टेंडर निघाल्यानंतर लवकरच येरवा ते लखमापूर अशी लाईन टाकून विद्युत सुरु केल्या जाईल अशी माहिती
एम. टी. राठोड उपकार्यकारी अभियंता, जिवती यांनी
आमच्या प्रतिनिधीशी बातचीत करतांना दिली आहे.
– या प्रसंगी (लखमापूर येथील नागरिक)भिमराव वेडमे, चिंन्नू कोटनाके, जागेराव कोटनाके, रघुनाथ कोटनाके, देवराव , जंगुबाई कोटनाके, जनाबाई कोटनाके, राधाबाई वेडमे, लिंगुबाई आडे, रुपाबाई कोटनाके आदी उपस्थित होते.






