अधिकारी व ठेकेदारांच्या समन्वया अभावी
चिनावल – वाघोदा – कुंभार खेडा रस्ता रखडला ..
विलास ताठे
ता.रावेर
वाघोदा चिनावल कुंभार खेडा हा सुमारे ६ कि.मी.रस्ता दिल्या वर्षापासून नादुरुस्त आहे जागोजागी मधोमध खड्डे पडून साईट पट्ट्या तुठले आहेत वारंवार हा रस्ता दुरुस्तीसाठी व नूतनीकरणासाठी परिसरातून जोरदार मागणी होत असतानाही रस्त्याचे काम मंजूर आहे मात्र संबंधित बांधकाम विभाग व ठेकेदार यांमध्ये समन्वय नसल्याने व यांच्यावर कोणाचाही अंकुश नसल्याने या रस्त्याचे काम मागील चार महिन्यांपासून रखडले आहे.
गेल्या निवडणुकीच्या काळात कुंभारखेडा कडून रस्ता दुरुस्तीचे नावाखाली काही ठिकाणे खडी टाकली गेली प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली नाही निवडणुकीनंतर तब्बल चार महिन्याचा काल गेल्यावरही अजूनही या रस्त्या ला सुरुवात झालेली नाही यामुळे वाघोदा चिनावल कुंभारखेडा येथील वाहन धारक शेतकरी यांना या रस्त्यावर भावी मोठी कसरत करावी लागत आहे या खराब रस्त्यावर वेळोवेळी अपघातही झाले आहेत मात्र संबंधित याकडे पूर्ण डोळेझाक करून रस्त्याचे काम सुरू करीत नसल्याने परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
संबंधित विभाग अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींनी याबाबत जाब विचारावा व अगदी मोडकळीस आलेला रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी चिनावल कुंभारखेडा वाघोदा परिसरातील वाहन धारक शेतकरी ग्रामस्थांमधून होत आहे.






