Maharashtra

कोजिमाशि संस्थेची विनाकारण नाहक बदनामी थांबवावी-दादासाहेब लाड

कोजिमाशि संस्थेची विनाकारण नाहक बदनामी थांबवावी-दादासाहेब लाड

कोल्हापूर-सुभाष भोसले
कोजिमाशि पतसंस्थेने सभासदा करता खरेदी केलेल्या प्रवासी बॅग वस्तूची किंमत रुपये १७५०आहे.
कोजिमाशि पतसंस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना अमेरिकन टूरिस्ट कंपनीच्या कॅमलॅंट ट्रॅव्हल्स बॅगचे(३वर्षे इंटरनॅशनल वॉरंटी ) भेट स्वरूपात वाटप सध्या सर्वत्र सुरू आहे .या भेटवस्तू बदल सभासद व शाळांमधून समाधान व्यक्त होत आहे. तसे अनेक सभासदांनी व शाळांनी फोनद्वारे व लेखी अभिप्रायासह संस्थेस कळविले आहे. मात्र काही मोजके सभासद भेट वस्तूच्या किमतीबाबत व्हाट्सअप वर चूकीचे संदेश पाठवून विनाकारण संस्थेची बदनामी करीत आहेत .अशा मंडळींनी संस्थेच्या प्रधान कार्यालयात येऊन भेट वस्तूच्या खरेदी किमतीची खात्री करावी आणि खातरजमा करून प्रतिक्रिया व्यक्त केली असती तर खूप बरे झाले असते .सदर भेट वस्तूची एमआरपी किंमत रुपये १७१०इतकी दिसते . तर ही भेट वस्तू रिटेल मार्केटमध्ये रुपये २२००ते २५००या दराने विकली जाते. या भेट वस्तूची ऑनलाईन किंमत २४८५ रुपये इतकी दिसत आहे. मात्र सभासदांना भेट दिलेली हीच बॅग कोजिमाशि पतसंस्थेने सभासदांकरिता निव्वळ रुपये १७५०इतक्या किमतीत खरेदी केली आहे. याबाबतची सभासद या नात्याने कोणाही सभासदाने संस्थेच्या प्रधान कार्यालयात येऊन किमतीची खात्री करावी . विनाकारण अशा काही मंडळींनी संस्थेची नाहक बदनामी थांबवावी. आज मीतिला आपल्या संस्थेचा नावलौकिक राज्यांमध्ये एक आदर्श पतसंस्था म्हणून आहे .याची कृपया नोंद घ्यावी.
अशी प्रतिक्रिया चेअरमन कैलास सुतार ,व्हॉइस चेअरमन सुभाष पाटील ,तज्ञ संचालक दादासाहेब लाड, सीईओ अरविंद पाटील व सर्व संचालक मंडळ कोजिमाशि पतसंस्था कोल्हापूर यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button