किरीट सोमय्या पोलिसांना झुगारून कोल्हापूर कडे रवाना..! हायवोल्टेज ड्रॉमा शेवटी मुंबई पुरता संपला पाहू या कोल्हापुरात काय घडते..!
मुंबई किरीट सोमय्या हसन मुश्रीफ प्रकरणात कोल्हापूर ला जात असताना मुंबईत त्यांना अडविण्यात आले.आज CST स्थानकात हा हायवोल्टेज ड्रॉमा घडला..किरीट सोमया महालक्ष्मी एक्स्प्रेस पकडून कोल्हापूरला रवाना झाले आहेत. ठाकरे सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. कोल्हापूर दौरा थांबवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
याबाबतीत अधिक माहिती अशी की हसन मुश्रीफ यांचा घोटाळ्याची माहिती घेण्यासाठी किरीट सोमय्या कोल्हापूर ला जाणार होते. किरीट सोमय्यांनी कोल्हापुरात येऊ नये यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिका-यांनी नोटीसही बजावली आहे. पण कोणत्याही परिस्थिती कोल्हापूरला जाणार असं सोमय्यांनी म्हंटलं होते. त्याप्रमाणे किरीट सोमय्या छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातून महालक्ष्मी एक्स्प्रेस पकडण्यासाठी स्थानकात आले असताना पोलीस आणि सोमय्या यांच्यात हायवोल्टेज ड्राम पाहायला मिळाला. पोलिसांनी सोमय्यांना अडवलं होतं. मात्र त्यांना जुगारून सोमय्या कोल्हापुरासाठी रवना झाले आहेत.आता कोल्हापुरात काय घडेल हे उद्या सकाळी समजेलच…
दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्यांवरील कारवाईवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.याच पार्श्वभूमीवर आता कोल्हापुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ठाणे, सातारा आणि कोल्हापुरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.






