कांदलगांव ग्रामपंचायतमध्ये रक्तदान शिबिराने महापुरुषांची जयंती साजरी.
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे :इंदापूर तालुक्यातील कांदलगांव या गावात सर्व शासकिय नियमांचे तंतोतंत पालन करुन महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले या महापुरूषांची सामुहिक जयंती साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत ने या रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.
सध्या देशात कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने संचार बंदी कायदा लागू अाहे. त्यामुळे कोणीही रस्त्यावर न उतरता कोणतीही आतिशबाजी न करता आपापल्या घरातचं डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती साजरी करावी असे आवाहन प्रशासनाने केले होते. त्यास सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तर दुसरीकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भविष्यात भारणारा रक्ताचा तुटवडा पाहुन नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्याच अनुषंघाने कांदलगांव ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच,सर्व सदस्य व ग्रामसेवक यांनी याचा सारासार विचार करून ही रक्तदान शिबिराची संकल्पना यशस्वी राबवली.
सरपंच रविंद्र पाटील व ग्रामपंचायत सदस्य विजय सोनवणे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला योग्य ते सोशल डिस्टंन्सिंग अंतर राखत टप्प्याटप्प्याने सर्वांनी उपस्थिती लावली. यावेळी उपसरपंच कमल राखुंडे,सदस्या रेखा बाबर ,तेजमाला बाबर, कोंडाबाई जाधव, सुवर्णा तुपे, सदस्य उल्हास पाटील, किसन सरडे, बाळू गिरी, दशरथ बाबर पोलीस पाटील शैलजा पाटील अादींचीही उपस्थिती होती.
सर्व प्रथम रक्तदान आयोजित केलेले सभागृह संपुर्ण पणे निर्जंतुकीकरण करण्यात आले. सर्व शासकीय नियमांचे पालन करित सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेण्यात आली.ज्या ठिकाणी रक्तदान शिबीर घ्यायचे होते त्याठिकाणी सोडियम हायपोक्लोराईडने फवारणी करून संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आले होते,तसेच हातधुण्यासाठी हँन्डवाॅश व सॅनिटायझरची सुविधा ठेवण्यात आली होती व प्रत्येक रक्तदात्याने मास्क लावून येणे सक्तीचे केले होते.ग्रामपंचायतने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीरामध्ये अनुक्रमे सतीश पांढरे(पंचायत समिती सदस्य),दशरथ बाबर,विजय सोनवणे, किसन सरडे,बाळू गिरी,गणेश बाबर,ज्ञानदेव तळेकर,आकाश सोनवणे,दिंगबर ननवरे,शंकर सरडे, बाळासाहेब जगताप(मोकाशी),सचिन व्यवहारे,वैभव व्यवहारे,निखिल बगाडे,अविनाश गटे,ज्ञानेश्वर कांरडे,श्रीराम लुचारे,आकाश सरडे,समाधान जगताप,विजय बाबर,प्रकाश सोनवणे,नवनाथ कुंभार,दिपक काशीद,सागर सोनवणे, लखन सोनवणे,प्रमोद जगताप,सुरज सरडे,संदीप पाटील,शिलाजीत सोनवणे, ॠषीकेश सरडे,सोमनाथ सूर्यवंशी,अक्षय राखुंडे,भैरवनाथ गोसावी,संतोष बाबर,बापू सोनवणे,निलेश राखुंडे,विठ्ठल भोसले,विक्रम लुचारे,राहुल चव्हाण आदी रक्तदात्यांचा समावेश आहे.
सध्या सर्व स्पर्धा परिक्षा सध्या कोविड१९मुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास येण्यासाठी आॅनलाईन ज्ञानमंजुषा सकाळी ठिक ११वाजता चालू झाली,यावेळी २५ विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते.परीक्षा घरी बसूनच द्यायची होती,त्यामुळे कुठेही सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन झाले नाही.या ज्ञानमंजुषेत वैष्णवी पाटील(कांदलगाव प्रथम),श्रद्धा पाटील(कांदलगाव द्वितीय)हर्षद रामचंद्र भोसले,(पंधारवाडी तृतीय) असे विजेते घोषित करण्यात आले.लाॅकडाऊन संपल्यावर विजेत्यांना पुस्तक संच व प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी दिली.
ग्रामसेविका स्वाती चव्हाण व सरपंच श्री.रविंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या या उपक्रमाचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांसह ग्रामस्थांकडून भरभरून कौतुक होत आहे. सर्व रक्तदात्यांचे सरपंच श्री.रविंद्र पाटील,आणि ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष बाबर,दशरथ बाबर,पांडुरंग इंगळे,राजु मदने यांनी प्रयत्न केले.






