Nashik

कळवण-सुरगाणा मतदारसंघातील शिवसेना महीला आघाडीचा संयुक्तिक मेळावा सुरगाणा येथे संपन्न विजय कानडे दिंडोरी लोकसभा महीला संपर्कप्रमुख डाॕ.स्नेहल मांडे यांनी केले मार्गदर्शन..

कळवण-सुरगाणा मतदारसंघातील शिवसेना महीला आघाडीचा संयुक्तिक मेळावा सुरगाणा येथे संपन्न
विजय कानडे दिंडोरी लोकसभा महीला संपर्कप्रमुख डाॕ.स्नेहल मांडे यांनी केले मार्गदर्शन..

सुनील घुमरे नाशिक

नाशिक : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर, ठाकरे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे.अशी जनतेची भावना झाली आहे.याच मुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दव ठाकरे साहेब यांचे आदेशाने राज्यातील महीलांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी संपुर्ण जिल्ह्याच्या महीला संपर्कप्रमुख विधानसभानिहाय दौरा करत आहेत,याच पाश्वभुमिवर आज (दि.१९)रोजी कळवण सुरगाणा मतदार संघातील महीला आघाडीचा संयुक्तिक मेळावा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख डाॕ.स्नेहल ताई मांडे यांचे अध्यक्षतेखाली आरटीओ चेक नाका,घागबारी येथे घेण्यात आला.
यावेळी तालुकाप्रमुख मोहन गांगुर्ड
यांनी आपल्या सुरगाणा तालुक्यातील जिव्हाळ्याचा प्रश्न पाणी व आरोग्य याविषयी सविस्तर विषयाची मांडणी करुन हे प्रश्न मुख्यमंत्री साहेबांकडे सांगण्यास विंनती करुन,गेल्या चाळीस वर्षापासुन हा तालुका ह्या दोन समस्यांनी कसा वेढला गेला आहे,व लोकप्रतिनिधीचीं या विषयी अनास्था विषद केली.
महीला आघाडी संपर्कप्रमुख मांडे ताई यांनी सुध्दा आश्वासित केले कि,तुमच्या समस्या नक्कीच मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जातील तसेच उपस्थितीत महीलांना बचत गटाच्या माध्यमातुन काय कामे केली जातात,शासनाच्या योजनांची माहीती दिली, पाणी व आरोग्य हे प्रश्न लवकरच पक्षप्रमुख यांचे पर्यंत जातील असे मार्गदर्शनात सांगितले.
यावेळी उपस्थितीत महीलांनी आपल्या समस्या सांगीतल्या महीला आघाडी तालुका संघटक सुशिला चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सत्यवती आहेर यांनी बचत गटास येणाऱ्या अडचणी मांडल्या
महीला आघाडी मेळाव्यास ग्रामिणच्या जिल्हा संघटक मंगलाताई भास्कर, कळवण तालुका महीला संघटक प्रितीताई मेणे,सुरगाणा शहर संघटक सिमा परदेशी,युवासेना जिल्हा अधिकारी आदित्य केळकर,उपजिल्हाप्रमुख योगेश वार्डे,सोशलमिडीया जिल्हाप्रमुख ललित आहेर,उपतालुकाप्रमुख एकनाथ भोये,सुष्मा गांगुर्डे, लहाणी धुळे, योगीता गावीत ,संगीता गायकवाड, विठा गांगुर्डे ,सिंधु जाधव, प्रभा वाघ, अरुणा पवार ,वैशाली धुळे, जया गांगुर्डे, नर्मदा धुळे ,यासह बचत गटाच्या अध्यक्ष व प्रतिनीधी तसेच मोठ्या संख्येने महीला भगिणी उपस्थितीत होत्या

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button