दिंडोरी तालुक्यातील पत्रकार हे समाजाची चावी असून ज्या गावचे पत्रकार चांगले त्या गावचे नेतेही चांगले असतात – प्रविण नाना जाधव
– सुनिल घुमरे नासिक
पत्रकार हे समाजाची चावी असून ज्या गावचे पत्रकार चांगले त्या गावचे नेतेही चांगले असतात असे प्रतिपादन मविप्र संस्थेचे कार्यकारी संचालक प्रवीण नाना जाधव यांनी केले.
जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय दिंडोरी येथे पत्रकार दिननिमित्त पत्रकार सन्मान सोहळा कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले सामाजिक कार्य करताना खूप वेळ खर्च करावा लागतो आणि तो वेळ समाज कार्य करणाऱ्याला नक्की दिला पाहिजे त्याला उभारी दिली म्हणजे तो अधिक प्रामाणिकपणे काम करतो. हे नक्की खरे सर्व पत्रकारांना एकत्र आणणं हे काम सोपं नाही ते प्राचार्य वडजे सर यांनी करून दाखवले ही एक कला आहे. सर्वतोपरी माणूस घडवण्यासाठी असे कार्यक्रम घेणे आवश्यक आहे. यातून सर्वात चांगला माणूस घडतो माणूस घडवण्यात देखील पत्रकारांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. तेच या समाजाची चावी आहेत. समाजातील चांगल्या वाईट घडामोडींचं ज्ञान हे पत्रकारांना असते त्यांच्या लेखणीत सर्व प्रकारची ताकद एकवटलेली असते. ज्या गावचे पत्रकार चांगले त्या गावचे नेते चांगले व कार्य देखील चांगले ही प्रचिती सतत येत असते.
यावेळी व्यासपीठावर मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव, नगरसेवक सुजित मुरकुटे, प्रदीप घोरपडे, जेष्ठ सभासद सुभाष बोरस्ते,केशवराव जाधव,माजी मुख्याध्यापक विजय जाधव,नारायण जाधव ,चेतन जाधव, प्राचार्य रमेश वडजे, उपप्राचार्य सोपान वाटपाडे,
पर्यवेक्षक डॉ. गजानन आंबोरे, रमेश मोकळ,श्रीम एन पी चौधरी ,सेवक सोसायटी संचालक कृष्णराव मोरे, पत्रकार संघाचे भगवान गायकवाड संतोष कथार सुनील घुमरे , विलास ढाकणे, अशोक निकम, बापू चव्हाण, सुखदेव खुर्दळ, संदीप मोगल, संदीप गुंजाळ , समाधान पाटील अशोक केंग आदी जेष्ठ पत्रकार व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवर व पत्रकार बांधवांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यालयाचा स्वरधारा गीत मंच यांनी स्वागत गीताने स्वागत केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रमेश वडजे यांनी केले. त्यानी “पत्रकार हे सामाजिक शैक्षणिक राजकीय कार्यातील प्रत्येक घटकाला होणाऱ्या बदलांची माहिती चालू घडामोडींची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर आज तागायत करत आलेले आहेत . पत्रकार बंधू तळागाळातील शेतकरी ,विद्यार्थी, शिक्षक यांच्या असणाऱ्या समस्या वृत्तपत्रांमधून झळकवतात व त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याचे काम करत असतात. लेखणी हे अत्यंत महत्त्वाच्या हत्यार आहे .
सर्व पत्रकार बांधवांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, लेखणी, गुलाब पुष्प व फाईल देऊन सन्मान केला.
पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष कथार यांनी बोलतांना सांगितले की “आम्हा पत्रकारांचा सत्कार करून आमचे मनोबल वाढवले. सर्व समस्यांची आम्ही दखल घेण्याचा प्रयत्न करतो .ही पत्रकारिता म्हणजे एक जनजागृती आहे सत्यता आहे आजच्या तंत्रज्ञानामध्ये किती व्हिडिओ आले तरी देखील पत्रकाराने दिलेल्या बातमी शिवाय त्याची सत्यता समाजाला पटत नसते आणि म्हणून सत्यता समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम या ठिकाणी आम्ही करत असतो.
जेष्ठ पत्रकार सुनील घुमरे यांनी देखील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समाजातील वास्तवाची जाणीव वैचारिक संघर्षातून समाजाला न्याय मिळवून देणे हे आमचे पत्रकारांचं कर्तृत्व आहे आम्ही कोणत्याही मूल्याची अपेक्षा न ठेवति समाजाला यथोचित न्याय व समाजातील मागण्या कशा पूर्ण करता येतील यासाठीची आमची धडपड असते. आमची लेखणी ही समाजासाठी आहे. स्वतःसाठी नाही.” असे मत त्यांनी व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती सरला कदम यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार उपप्राचार्य श्री सोपान वाटपाडे यांनी मानले.
फोटो-
दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयात पत्रकार दिनानिमित्त पत्रकार सन्मान सोहळा प्रसंगी मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव, प्राचार्य रमेश वडजे, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, नगरसेवक व पत्रकार आदी






