जळगाव जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने मा. पोलीस निरीक्षक, अमळनेर व मा. तहसीलदार अमळनेर यांना निवेदन देण्यात आले
अमळनेर : जळगाव जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील हे बोदवड तालुक्यातील येवती येथील रहिवाशी आहे. सदरील गाव शेलवड साळशिंगी गटात येत असून ते याच गटातून जिल्हा परिषद निवडणूकीची जोरदार तैयारी करत असल्याने त्यांच्यावर याच गटातील जिल्हा परिषद सदस्य पती रामदास पाटिल व त्यांचा मुलगा शुभम पाटील यांच्याकडून वारंवार हल्ला करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न होत आहे. दिनांक 18/09/2021 रोजी बोदवड शहरातील जुने तहसिल कार्यालयाच्या परिसरात असतांना युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटिल यांची गाडी अडवत हल्ला करण्याच्या ऊद्दीष्टाने गाडीवर थापा मारल्या. त्यानंतर गाडीचा पाठलाग रामदास पाटील व शुभम रामदास पाटील यांनी केला.
त्यानंतर, झालेल्या हल्ल्याबाबत फिर्याद दाखल करण्यासाठी प्रा हितेश पाटील बोदवड पोलिस ठाणे येथे गेले असता त्याठिकाणी आरोपींच्या वतीने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जमाव गोळा करण्यात आला. आरोपींवर कुठलाही गुन्हा दाखल होऊ नये यासाठी दबावतंत्र प्रस्थापित करण्यासाठी हा जमाव फिर्यादींवरोधात जमा झाला होता. जिल्हाध्यक्ष यांनी गुन्हा नोंद करू नये यासाठी दबावतंत्र प्रस्थापित करण्यासाठी बेकायदेशीर जमावासहित उपस्थित असल्याचे पोलिस ठाण्याच्या सीसीटीव्ही मध्ये चित्रीत झाले आहे. त्यानंतर प्रा पाटील बोदवड पोलिस निरीक्षक साो. यांच्या दालनात गेले असता येथेही आरोपी व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गर्दी केली. फिर्याद दाखल करण्याचा अधिकार असतांना फिर्याद न देण्यासाठी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षांना जमावाचा त्रास सहन करावा लागला. राज्यासहित जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतांना बोदवड पोलिस ठाणे आवारात व पोलिस निरीक्षक साो. यांच्या दालनात कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियमांचे ऊल्लंघन करीत बेकायदेशीर जमाव जमलेला होता.त्यामूळे दिनांक १८ सप्टेंबर २०२१ रोजीच्या सायंकाळी ५ वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंतची सीसीटीव्ही पुरावा म्हणून विचारात घेऊन तसेच वृत्तपत्रांत आलेली नावे हा पुरावा घेऊन संबंधितांवर साथरोग प्रतिबंधात्मक कायदा व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे. यासंदर्भात अमळनेर युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस निरीक्षक, अमळनेर व तहसीलदार, अमळनेर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जळगाव जिल्हा युवक काँग्रेस महासचिव हर्षल जाधव, अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील, शहराध्यक्ष तौसिफ तेली, माजी युवक काँग्रेस शहराध्यक्ष सईद तेली, शहरकार्याध्यक्ष कुणाल चौधरी, शहर उपाध्यक्ष शाहीद तेली, अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष राजु भाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.






