जयराज इंपेक्स कंपनीपिंपळणारे च्या वतीने एक हजार कापडी मास्क चे वाटप
सुनिल घुमरे
कोरोनाचा बचाव करण्यासाठी महसूल विभाग, पोलीस कर्मचारी व आरोग्य विभाग व पत्रकार हे अहोरात्र झटत आहे.सामाजिक बांधिलकी म्हणून पिंपळणारे येथील माजी उपसरपंच राजेश खांदवे यांच्या
जयराज इंपेक्स कंपनीमध्ये कापडी मास्क कोरोना चे काळात बनविले जात असून तालुक्यात व जिल्यात त्यांच्या कंपनी कडे मास्क ची मागणी चांगला प्रकारचे मोठ्या प्रमाणात होत आहे.
पुन्हा स्वच्छ घुवून वापरता येथील असे मास्क त्यांनी आपल्या कंपनीत बनविले आहे. विक्री बरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून राजेश खांदवे यांनी दिंडोरी पेठ विभागाचे प्रांतअधिकारी डॉ संदीप आहेर यांच्या कडे एक हजार मास्क दिले आहेत.तसेच पत्रकारांनाही मास्क चे वाटप यावेळी करण्यात आले.यावेळी तहसीलदार कैलास पवार, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे आदी उपस्थित होते.
महसूल विभागात ,आरोग्य, व पोलीस विभागात या मास्क चे वाटप करण्यात येणार आहे.
फोटो- जयराज इंपेक्स कंपनी च्या वतीने एक हजार कापडी मास्क संचालक राजेश खांदवे यांनी प्रांतअधिकारी डॉ संदीप आहेर यांना सुपूर्द करतांना उपस्थित होते






