Maharashtra

जय संघर्ष वाहन चालक संस्थेतर्फे मिरखा तडवी कोरोना योध्दा सन्मान पत्राने सन्मानित

जय संघर्ष वाहन चालक संस्थेतर्फे मिरखा तडवी कोरोना योध्दा सन्मान पत्राने सन्मानित

प्रतिनिधी मुबारक तडवी

मुंबई येथे बीएमसी त वाहन चालक पदावर कार्यरत जळगांव जिल्ह्यातील चुंचाळे तालुका यावल येथील रहिवासी मिरखा नुरखा तडवी यांना जय संघर्ष वाहन चालक संस्थेतर्फे कोरोना महामारी च्या संकटकाळात रुग्णसेवेकरीता स्वताच्या जिवाची काही एक पर्वा न करता जनतेला रुग्ण सेवा कार्य करीत खर्या कोरोना योध्दा च निस्वार्थ कार्य केल्याबद्दल जय संघर्ष वाहन चालक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर , प्रविण वाघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी कोरोना बचाव कार्यासाठी कोरोना योध्दा सन्मान पत्र देऊन सन्मानित केले यांसह मिरखा तडवी हे आदिवासी तडवी भिल समाजाची हक्काची अंम्बुलन्स व्दारे ही अहोरात्र अथक परिश्रम घेत आरोग्य व रुग्ण सेवा कार्य करीत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन सन्मानित केले बद्दल जय संघर्ष वाहन चालक संस्थेचे आदिवासी तडवी भिल समाजातील त्रिमूर्ती फाऊंडेशन ग्रुप, तडवी भिल युवा कृती समिती, तडवी डॉक्टरफाऊंडेशन,आसेमं,आफ्रोट, तडवी द गाईड,तडवी फैजपुरियन्स ग्रुप, जळगांव जिल्हा समाज सेवक ग्रुप,सह समाज बांधवांनी आभार मानले व शुभेच्छा दिल्या

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button