कळवण तालुक्यातील जयदर येथे खा.डॉ.भारती पवार यांच्या हस्ते मका खरेदी केंद्राचे उदघाटन संपन्न
सुनिल घुमरे नाशिक
Nashik : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ खरेदी केंद्र जयदर येथील मका खरेदी केंद्राचे उदघाटन दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत राज्यात ठिकठिकाणी मका खरेदी केंद्रे सुरू करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत ही खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहे. याचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन खा.डॉ.भारती पवार यांनी कार्यक्रमाप्रसंगी केले. या उदघाटनाप्रसंगी उप प्रादेशिक व्यवस्थापक सुवर्णा मोरे, तुषार मोरे, कळवण भाजपा तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, भाजपा जेष्ठनेते सुधाकरजी पगार, गोविंद कोठावदे, महिला मोर्चा कळवण तालुका अध्यक्ष सोनाली जाधव, काशीनाथ जाधव, नारायण हिरे, सुभाष शिरोडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालू पगार, प्रवीण राउंदळ, हेमंत रावले, मनोहर बोरसे ,आशुतोष आहेर, भूषण देसाई तथा अनेक मका उत्पादक शेतकरी या कार्यक्रमास उपस्थित होते.






