कृषी पदवीधर संघटना तर्फे कृषी सप्ताह चे औचित्य साधून गावामध्ये कार्यक्रम
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे आज कृषी सप्ताह सहावा दिवस या निमित्त कृषी पदवीधर संघटना पदाधिकारी यांनी गावातील ग्रामपंचायत व भगवंतकृषी केंद्र येथे भेट . त्यावेळी गावचे सरपंच बाबासाहेब धोत्रे उपसरपंच मा श्री हंसराज देशमुख लोकनियुक्तपिंटू जाधव तसेच प्रगतशील बागायतदार विकी देशमुख भैयाराव वाघमारे बाळू खपाले तसेच एजाज शेख भानुदास पाटील हे उपस्थित होते. तसेच युवा उद्योजक शिवम शेंडे होते. कृषी पदवीधर संघटना तर्फे मान्यवर चा सत्कार करण्यात आला. कृषी पदवीधर संघटना मार्फत गावात कार्यक्रम घेतल्यामुळे गावात संघटनेचा कामाचे स्वरूप कळले. मान्यवर यांनी पदाधिकारी यांचे कौतुक केले. यावेळी तिथे सोलापूर जिल्हा युवती कार्याध्यक्ष अभिलाषा पाटील, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अनिल काशीद पंढरपूर युवक तालुका अध्यक्ष शुभम यादव तसेच पंढरपूर तालुका उपाध्यक्ष अभिजित ढवळे सदस्य उपस्थित होते.त्यावेळी अभिलाषा ताई नी बोलताना महिला सक्षमकरण याबद्दल माहिती दिली. व शुभम यादव यांनी बोलताना शेतकरी यांनी केलेल्या मागणीला ऊत्तर देत covid-19 पार्शवभूमी वर वीज बिल माफ करण्याचे निवेदन मांडणार आहे असेल सांगितले. अनिल काशीद यांनी संघटना बद्दल माहिती देत. द्राक्षे बागायतदार यांना मार्गदर्शन केले. मा उप सरपंच देशमुख यांनी पदाधिकारी यांचे संपर्क नोंद करून घेतले. इथून पुढ काही अडचणी आल्या तर संघटनेचे पदाधिकारी यांना संपर्क करू असेल आव्हान केले. संघटनेच व पदाधिकारी यांचे कौतुक केले. मा सरपंच यांच्या आभार प्रदर्शना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.






