माध्यमिक शालांत परीक्षेत द.ह. कवठेकर प्रशालेची साक्षी सुहास कुलकर्णी प्रशालेत प्रथम
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर : मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने नुकताच जाहीर झाला यात द.ह. कवठेकर प्रशालेची विद्यार्थीनी कु. साक्षी सुहास कुलकर्णी हिने 99.60% गुण प्राप्त करुन प्रशालेत प्रथम क्रमांक मिळविला. प्रशालेचा निकाल 99.30 टक्के लागला. प्रशालेतून अनुक्रमे कु.साक्षी सुहास कुलकर्णी 99.60 टक्के, प्रथम, कु. श्रावणी पत्की क 99.20 टक्के व्दितीय, कु.अपुर्वा जाधव 98.60 टक्के तृतीय क्रमाने उत्तीर्ण झाले आहे 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 70आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुधाकरपंत परिचारक अध्यक्ष माननीय वा. ना. उत्पात संस्थेचे सचिव मो.चि. पाठक श्री वा.गो. भाळवणकर पदाधिकारी नानासाहेब रत्नपारखी, द. ह.क.प्रशाला चेअरमन श्री. सु.र.पटवर्धन व सर्व पदाधिकारी तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री प्र.गो.डबीर उपमुख्याध्यापकश्री द.शि. तरळगट्टी पर्यवेक्षक व्ही. वाय. पाटील.व सर्व शिक्षक शिक्षकेतर यांनी केले.






