sawada

रोझोदा येथे वृध्द दांपत्यांची निर्घृण हत्येचा, पोलीसांनी लावला बारा तासात छडा ! गाव, परिसरातून केले पोलीसांचे अभिनंदन :आरोपीला पाच दिवसाची पोलीस कोठडी.

रोझोदा येथे वृध्द दांपत्यांची निर्घृण हत्येचा, पोलीसांनी लावला बारा तासात छडा ! गाव, परिसरातून केले पोलीसांचे अभिनंदन :आरोपीला पाच दिवसाची पोलीस कोठडी.

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

येथून जवळच असलेल्या रोझोदा येथे राहत्या घरात वृध्द दांपत्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना काल सकाळी उघडकीस आल्याने, एकच खळबळ उडाली असून, गाव परिसरात घबराट पसरली होती. मात्र वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली कटाक्षाने तपासाची सुत्रे फिरवित तब्बल बारा तासात आरपी परेश खुशाल भारंबे वय वर्षे ३५ याला ताब्यात घेतले असता त्यांने माझेवर खुप कर्ज होते ते फेडण्यासाठी माझ्याने घटना घडल्याचे कबुल केले आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, रोझोदा येथे सेवानिवृत्त ग्राम विस्तार अधिकारी, ओंकार पांडुरंग भारंबे वय वर्षे ९०. त्यांची पत्नी सुमन औकार भारंबे वय वर्षे ८५.हे वृध्द दांपत्यं राहात होते.

त्यांच्या परिसरात काही दिवसांपूर्वी पासून कंटेनमेन झोन जाहीर करण्यात आले होते. नियमानुसार दररोज सकाळी डॉक्टर सहकारी येऊन तेथील नागरिकांना तपासणी करीत असत. या अनुषंगाने काल सकाळी डॉ. हारून काझी तपासणी साठी आले असता, डॉक्टरांना भारंबे दांपत्याच्या घरातून कोणी प्रतिसाद दिला नाही. तेव्हा डॉक्टरांनीच दरवाजा उघडला असता, घरात वृध्द पती – पत्नी दांपत्यं रक्ताचे थारोळ्यात पडलेले त्यांना दिसले. पोलीस पाटलांनी लागलीच सावदा पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. एपीआय राहुल वाघ यांनी लागलीच सहकार्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी पंचनामा केला.

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक आणले असता श्वानाने शेजारच्या गुरांच्या वाड्यातून फिरून, घटनास्थळघराचे गच्चीवरून परत खाली उतरून, परेशच्या घराचा माग दाखविला तेव्हा परेश हा शेतात होता. पोलिसांनी परेशला शेतातून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपी परेश पोपटा सारखा बोलू लागला. माझ्यावर कर्ज असल्याने कर्ज फेडण्यासाठी मी चोरी करताना दोघांची हत्या केल्याचे कबुल केले. आरोपी हा वृध्द दांपत्याच्या घरा नजिकच राहात होता. त्यांचा सख्खाचुलत नातु नातेवाईक असल्याचे गावकर्‍यांनी सांगितले. तो त्यांच्या घरातील कामेही करायचा. त्याला माहित होते की यांचे कडे खुप रोकडा कँश आहे. मी मध्यरात्री त्यांचे घरात प्रवेश केला. नोटांची काही बंडले घेऊन घरा बाहेर निघतांना म्हातार्‍यांना जाग आली. त्यांना रोखण्याच्या बेतात मी माझ्या जवळच्या सुरयाने त्यांचेवर वार केलेत.त्यामुळे मृत्यू झाल्याचे आरोपीने पोलीसांना सांगितले आहे. पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले अप्पर पोलीस अधीक्षक गायत्री नवटके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहम हे रोझोदा येथे ठाणमांडून होते. श्वानपथकाच्या मदतीने थेट परेशच्या घराचा माग काढल्याने तपासाची दिशा मिळाली व त्यानंतर परेशला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्य़ाची कबुली देत, त्याचे रक्ताने भरलेले कपडे कुटाचे ढिगार्यातून काढून दिले आहे. आज आरोपीला रावेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास करीत असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button