श्री गणेश उत्सव २०२१ व आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने अमळनेर शहरतील संवेदनशील भागात रॅपिड ऍक्शन फोर्स व अमळनेर पोलीस स्टेशन अधिकारी व अंमलदार तसेच होमगार्ड यांचा रूट मार्च घेण्यात आला.
अमळनेर : शहरातील संवेदनशील भागात मिस्त्र वस्ती व जास्तीत जास्त गणपती स्थापना झालेल्या भागात रूट मार्च हा पोलिस कवायत मैदान येथून सुरू करुन वड चौक, झामी चौक, भोई वाडा, माळी वाडा, कसाली मोहल्ला, जामा मशीद, वाडी संस्थान, पानखिडकी, सराफ बाजार, अंदर पुरा मशीद, दगडी दरवाजा, बहेरपुरा मशीद, मोठी बाजारपेठ, झाशी राणी चौक, गांधलीपूरा व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे संपविला आहे.
सदर रूट मार्च मध्ये रॅपिड ऍक्शन फोर्स चे ०१ पोलीस निरीक्षक, ०८ पोलीस अधिकारी, एकूण ८१ कर्मचारी तसेच पो.नि.श्री.जयपाल हिरे यांचे सह ०५ पोलीस अधिकारी, ३५ अंमलदार व ३२ होमगार्ड आरसीपी प्लाटून १+१६ आणि ट्रॅकिंग फोर्स १+१० उपस्थित होते.






