12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी…!
राज्यातील 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बारावीचा निकाल येत्या 30 जुलैला लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने 12 वी चा निकाल हा 31 जुलैपर्यंत लावण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशानुसार शिक्षण मंडळाने निकाल लावण्यासाठी कंबर कसली आहे.
निकालाची तयारी अंतिम टप्प्यात
न्यायालयाच्या आदेशामुळे शिक्षण मंडळ जोमाने निकाल लावण्याची तयारी करत आहेत. तसेच विद्यार्थ्यांनाही पुढील शिक्षणासाठी 12 वीचा निकाल महत्वाचा आहे. त्यामुळे आता विद्यार्थी मंडळीचं लक्ष हे निकालाकडे लागली आहे. तसेच त्यांची धाकधुकही वाढीस लागलीये.






