Important:बँकांची कामे त्वरीत पूर्ण करा..! पुढील महिन्यात तब्बल 13दिवस बँक राहणार बंद..! पहा तारखा..!
सप्टेंबर महिन्यात सुट्ट्यांची भरमार आहे. वर्षाच्या या नवव्या महिन्यात तब्बल 13 दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहे. त्यामुळे या महिन्यात बँकेत (Bank) जाण्यापूर्वी तुम्ही सुट्ट्यांची यादी तपासली पाहिजे.
यापैकी काही सुट्ट्यांच्या दिवशी केवळ राज्यातील (State) बँका बंद असणार आहेत. तर काही सुट्ट्यांच्या दिवशी संपूर्ण देशभरातील सर्व बँका बंद असणार आहेत. पण तरीही चेक क्लिअरन्स, ऑफलाइन केवायसी (Offline KYC), खाते बंद करणे, खाते हस्तांतरण (Account transfer) यांसारखी काही कामे आहेत ज्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल.
सप्टेंबरमधील बँक सुट्ट्यांची यादी
देशभरातील बँका 6 दिवस राहणार बंद –
-31 ऑगस्ट गणेश चतुर्थी
– 4 सप्टेंबर रोजी पहिला रविवार
– 10 सप्टेंबर रोजी दुसरा शनिवार
– 11 सप्टेंबर रोजी दुसरा रविवार
– 28 सप्टेंबर रोजी तिसरा रविवार
– 24 सप्टेंबर रोजी चौथा शनिवार
– 25 सप्टेंबर रोजी चौथा रविवार
सप्टेंबर 2022 मधील बँक सुट्ट्या –
31 ऑगस्ट 2022 – गणेश चतुर्थी
4 सप्टेंबर 2022 – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
6 सप्टेंबर 2022 – कर्मा पूजा – रांचीमध्ये बँका बंद
7 सप्टेंबर 2022 – पहिला ओणम – कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद
8 सप्टेंबर 2022 – तिरुओनम – कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद
9 सप्टेंबर 2022 – इंद्रजात्रा – गंगटोकमध्ये बँक बंद
10 सप्टेंबर 2022 – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)
11 सप्टेंबर 2022 – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
18 सप्टेंबर 2022 – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
21 सप्टेंबर 2022 – श्री नारायण गुरु समाधी दिन – कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद
24 सप्टेंबर 2022 – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
25 सप्टेंबर 2022 – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
26 सप्टेंबर 2022 – जयपूर आणि इम्फाळमध्ये नवरात्रीच्या घटस्थापनेनिमित्त बँकेला सुट्टी असेल.






