India

?Big Breaking…गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ.. आज रात्री पासून “हे” असतील नवे दर..

?Big Breaking…गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ.. आज रात्री पासून हे असतील नवे दर..

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असताना आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. नवे दर आज दुपारी 12 वाजल्यापासून सर्वत्र लागू केले जाणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांच्या गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे.

गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने दिल्लीतील ग्राहकांना तो आता 769 रुपयांना मिळणार आहे.सरकारचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड ऑइल आणि नैसर्गिक गॅसच्या किंमतीत वाढ झाल्याचा हा परिणाम आहे.
पेट्रोल- डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. एलपीजीच्या दरात आता 50 रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना 14 किलो वजनाच्या विनाअनुदानित सिलेंडरसाठी 769 रुपये मोजावे लागणार आहे. आज (15 फेब्रुवारी) दुपारी 12 पासून हे दर लागू होणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. या अगोदर 4 फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 25 रूपयांनी वाढ झाली होती. सिलेंडरची किंमत 694 रूपयांवरून 719 रुपये करण्यात आली होती.

तसेच नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलचे भावही गगनाला भिडले आहे. . पेट्रोलच्या दरात 28 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 34 पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीसह मुंबईत पेट्रोलचे दर 95.19 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर 86.02 रुपयांवर पोहेचले आहेत.

जनतेचे जीवन सुकर करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांमधील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. इंडियन ऑईलच्या ग्राहकांना संपूर्ण भारतभरात रिफिल बुकिंगसाठी आणि भुवनेश्वर शहरात नव्या कनेक्शनसाठी 8454955555 या क्रमांकावर मिस्ड कॉलच्या सुविधेचा वापर करता येईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button