महिलांनी आत्मनिर्भर झाल्यास देश आत्मनिर्भर होईल-जि.प.अध्यक्षा सौ.रंजना पाटील दिपाली गृप्स व नारीशक्ती गृप तर्फे फैजपूर येथे आत्मनिर्भर महिला मेळावा संपन्न
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : महिला आत्मनिर्भर झाल्यास नक्कीच देश आत्मनिर्भर होईल आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होईल असे प्रतिपादन फैजपूर येथे खान्देश नारीशक्ती गृप दिपाली गृप्स तर्फे आयोजित भव्य आत्मनिर्भर महिला मेळावा प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.रंजनाताई पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
फैजपूर येथे खान्देश नारीशक्ती गृप दिपाली गृप्स अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या तर्फे भव्य आत्मनिर्भर महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामनेर येथील लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.साधनाताई गिरीश महाजन या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.अध्यक्षा सौ.रंजना पाटील, रावेर पं.स.सदस्या सौ.योगिता वानखेडे, महिला मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.संगिता भामरे, ज्येष्ठ निरसेविका सौ.शकुंतला भारंबे,माजी नगराध्यक्षा सौ.आशालता चौधरी,सौ.सपना राणे,सौ.विद्या सरोदे,सौ.सारीका चव्हाण यांची उपस्थिती होती.यावेळी नारीशक्ती गृप तर्फे परिसरातील महिला भजनी मंडळे, महिला बचत गट,महिला कृषी गट,अंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेवीका, तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उपक्रमशील महिलांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन राजमाता जिजाऊ माँसाहेब व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
महिलांच्या हक्कांसाठी खान्देश नारीशक्ती गृप च्या माध्यमातून सौ.दिपाली चौधरी यांनी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असुन महिलांच्या सन्मानार्थ अतिशय स्तुत्य उपक्रम राबवित आहेत असे प्रतिपादन यावेळी जामनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.साधनाताई महाजन यांनी यावेळी केले.महिलांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा व स्वताचे लघुउद्योग सुरू करून आपल्यासोबत इतरांना देखील आत्मनिर्भर करावे असे आवाहन रावेर पं.स.सदस्या सौ.योगिता वानखेडे यांनी केले.महिलांनी चुल आणि मुल यापलीकडे जाऊन सर्व क्षेत्रांत पुढे आले पाहिजे असं मत यावेळी महिला मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.संगिता भामरे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी भुसावळ येथील महिला पत्रकार उज्वला ताई बागुल, सामाजिक कार्यकर्त्या राजश्री नेवे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी परिसरातील सर्व बचत गट,भजनी मंडळ,कृषी गट, अंगणवाडी सेविका यांच्यासह जवळपास चारशेहून अधिक महिला उपस्थित होत्या.सुत्रसंचालन संदिप पाटील यांनी तर आभारप्रदर्शन खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी केले.







