उपाशी लोकांची चूल सुरू ठेवू, कोरोना मुक्त करू – निवास निकम प्रहार जनशक्ती मीरा-भाईंदर शहराध्यक्ष –
प्रतिनिधी तुकाराम पाटील – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमी आपल्या देशात संचारबंदी लागू केली आहे. अशा परिस्थितीमध्ये हातावरचे पोट असणाऱ्या गरीब कुटुंबांचे मोठे हाल होत आहेत. दररोज काम केले तरच पोटाला मिळते असे त्यांचे जीवन आहे. अशा परिस्थितीत जीवन जगणाऱ्या लोकांना आधार देण्याच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या अभिनव संकल्पनेतून मीरा-भाईंदर शहरातील गरीब व दिव्यांग लोकांना जीवनावश्यक वस्तू तसेच जेवणाचे डबे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पुरवण्यात येणार आहेत अशी माहिती जन प्रहार मीरा-भाईंदर शहराध्यक्ष निवास निकम यांनी दिली.
मानवता हाच खरा धर्म आहे. या विचारधारेने प्रहार पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी समाजातील अशा गरीब, गरजू व दिव्यांगांना लोकांना मदत जायचे आहे. माणूस हा घराघरात जन्माला येतो, पण माणुसकी ठराविक जन्म घेते घरातच. आणि जिथे माणुसकी जन्म घेते परमेश्वराचे वास्तव्य असते. असे म्हटले जाते. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांना विनंती आहे अशा संकटकाळी प्रसंगी समाजातील अशा लोकांना मदत करून मानवता जपायचे आहे. कारण जेवणासाठी जीवन आणि जीवन आहे तर जेवण आहे. म्हणून चला चूल पेटवून उपाशी लोकांना आधार देऊया असे आवाहन शहराध्यक्ष निवास निकम यांनी केली.






