हिंदी सर्वांना एकत्र गुंफण्याची सशक्त भाषा- डॉ भारत भूषण
राष्ट्रीय एकात्मतेत हिंदी भाषेचे योगदान व हिंदी भाषा ही राष्ट्राला जोडण्याच महत्वपूर्ण कार्य करते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सर्वाना एकत्र आणण्याचे काम या भाषेने केले .महात्मा गांधी ,मदन मोहन मालवीय ,काका कालेलकर अशा विभिन्न लोकांनी राष्ट्राला जोडण्यासाठी या भाषेचा उपयोग केला असे मत गुरू नानक कॉलेज किलियावाली श्री मुक्तसर साहेब, पंजाब महाविद्यालयातील डॉ .भारत भूषण यांनी व्यक्त केले.
येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने हिंदी सप्ताहानिम्मित आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उपप्राचार्य प्रा .डॉ.अनिल भंगाळे अध्यक्ष स्थानी होते. विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे डॉ .योगेश पाटील प्रा डॉ. जी .एस.मारतळे, प्रा.डॉ.आय पी ठाकुर, डॉ.विजय सोनजे , प्रा .सतीश पाटील उपस्थित होते.
प्रास्तविक व परिचय विभाग प्रमुख प्रा.डॉ.कल्पना पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी कॉंग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन 1936 ला या भूमिवर भरले हे सांगितले यातून राष्ट्रीय एकात्मतेला पाठबळ कस मिळाले हे पण सविस्तरपणे सांगितले. राष्ट्रीय एकात्मता व हिंदी भाषेच्या प्रचारात महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा. लोकसेवक मधुकरराव चौधरी यांनी केलेल्या योगदाना बरोबर आपल्या सर्वांच कर्तव्य राष्ट्र्भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे हे आहे असे मत अध्यक्षिय समारोपात उपप्राचार्य डॉ.अनिल भं गाळे यांनी व्यक्त केले.
कोरोना च्या पार्श्वभूमी वर डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हिंदी विभागाच्या वतीने हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली कार्यक्रमाच्या संयोजनासाठी तापी परिसर विद्यामंडळाचे अध्यक्ष मा.श्री.शिरीषदादा मधुकरराव चौधरी, आमदार, रावेर विधानसभा मतदारसंघ, उपाध्यक्ष प्रा.डॉ.सुधाकर काशिनाथ चौधरी, उपाध्यक्ष श्री दामोदर हरी पाटील, चेअरमन श्री लिलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाईस चेअरमन प्रा. किशोर रामदास चौधरी, सचिव प्रा.
मुरलीधर तोताराम फिरके, सदस्य प्रा.पी.एच राणे, श्री. मिलिंद बापू वाघुळदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी,
उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा. दिलीप तायडे,
उपप्राचार्य प्रा डॉ.उदय जगताप यांनी शुभेच्छा दिल्या व
मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.विजय सोनेजे यांनी तर आभार प्रा. डॉ.आय.पी.ठाकुर यांनी व्यक्त केले.






