आशा सेविका मदतनीस यांनी केली निंभोरा सह परिसरात १४९०४ जणांची आरोग्य तपासणी
प्रतिनिधी संफिप कोळी
निंभोरा बु।। ता रावेर(वार्ताहर) रावेर तालुका वैधकीय अधिकारी डॉ शिवराय पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा आरोग्य केंद्र अंतर्गत निंभोरा बु ,वाघोदा बु, खिर्डी खु,खिर्डी बु, रेंभोटा,शिंगाडी, भामलवाडि, दसनूर,सिंगनूर, आंदलवाडी,बलवाड़ी, सिंगत, पूरी, गोलवाड़े, या गांवामध्ये डॉ.चंदन पाटिल, डॉ मोनिका चौधरी, यांच्या सह तीन जबाबदार सुपर वायजर, दहा आरोग्य सेवक, सेविका, दोन आशा गट प्रवर्तक ,३९ आशा वर्कर, अंगनवाडी सेविका ४५,मदतनीस ४३ यांना १४ गांव मधील ग्रामपंचायत कडून थर्मलगन, ऑक्सीपल्स मीटर ,ग्लोज, मास्क,सॅनीटायजर,फ्रेश गार्ड, असे साहित्य देऊन तसेच निंभोरा आरोग्य केंद्रा तर्फे ही ग्लोज,नाइन फाइव मास्क , मास्क, सॅनिटाइजर देऊन वरील १४४ जणां च्या टीमने गावा गावात घरोघरी जाऊन ५५ वर्ष वरील स्री, पुरुष व दहा वर्षा खालील मूल, मूली, गरोदर माता, दुर्धर आजार तसेच सर्व व्यवसायिक, भाजीपाला विक्रेते यांची थर्मलगन ने व ऑक्सिपल्स मीटर ने सर्वांच्या आरोग्याची ८४७३ घरातील ३६७२० पैकी १४९०४ जणांची तपासणी केली यात ३७ अंश सेंट मि तापमाना पेक्षा जास्त असल्यास व ऑक्सीजन पल ९५ पेक्षा कमी असल्यास अशांना पुढील उपचारा साठी कोविड १९ ला पाठविण्याचे होते. परंतु १४९०४ पैकी फक्त एका गावातील फक्त ५ जणांना कोविड १९ला उपचारा साठी पाठविन्यात आले आहे गेल्या ७जून पासून आरोग्य तपासणी चे काम निंभोरा आरोग्य केंद्राचे डॉक्टर सह सर्व कर्मचारी आशा गट प्रर्वतक, सर्व आशा वर्कर, अंगनवाडी सेविका, मदतनीस हे चांगल्या पद्धतिचे काम करतांना दिसत आहे.






