कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांप्यात आरोग्य तपासणी शिबीर
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे निःशुल्क वितरण सरपंच अतिश पवार यांचा पुढाकार.
प्रतिनिधी अनिल पवार
चांपा, ता,१८: नागपुरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आज शहरात आढळणाऱ्या कोरोना संसर्ग आजाराने ग्रामीण भागात ही डोके काढलेले आहे. कोरोना पासून स्वतः चा बचाव करायचा असले तर प्रत्येकाला आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढवावी लागेल.हीच बाब लक्षात घेत चांप्याचे सरपंच अतिश पवार यांनी लॉयन्स क्लबच्या सहकार्याने चांपा ( सुकळी) येथिल नागरिकांची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथिक आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे निःशुल्क वितरण सरपंच अतिश पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आली. याप्रसंगी लॉयन्स क्लबचे डॉ. रोहित माडेवार,पाचगाव आरोग्य केंद्राचे डॉ, कमलेश रावते यांच्या उपस्थितीत सरपंच अतिश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे निःशुल्क वितरण करण्यात आले.
आरोग्य शिबिरात नागरिकांची थर्मल स्कॅनिंग करण्यात आली ,सोबतच मधुमेह रक्तदाब तपासणी, सर्दी, खोकला, ताप , आंगपाय दुखणे, अशक्तपणा वाटणे आदी रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. व सोबतच निःशुल्क औषधी वितरण करण्यात आले
यावेळी चांप्याचे आरोग्य सेविका,उपसरपंच अर्चना सिरसाम, आशा वर्कर , अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ आदींच्या उपस्थितीत आरोग्य शिबिर घेण्यात आले.






