Amalner

हाथरस प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी द्या अन्यथा व्यापक व उग्र आंदोलन करण्यात येईल राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चा इशारा..

हाथरस प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी द्या अन्यथा व्यापक व उग्र आंदोलन करण्यात येईल राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चा इशारा..

प्रतिनिधी/ महेंद्र साळुंके

अमळनेर(प्रतिनीधी)हाथरस येथील पिडितेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व नराधम आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी.अन्यथा अमळनेर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तर्फे व्यापक व उग्र आंदोलन करण्यात येईल ,अशा आशयाचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात येऊन सदर घटनेचा तीव्र निषेध अमळनेर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तर्फे करण्यात आला.

उत्तरप्रदेश येथील हाथरस जिल्ह्यातील चंदपा परिसरातील एका गावात १९ वर्षीय पिडितेवर १४ सप्टेंबरला सामूहिक बलात्कार केला होता. यात पिडितेची जीभ कापली,मणक्याचे हाड देखील मोडण्यात आले आहे.९ दिवसांनी पिडीत मुलगी शुद्धीवर आली. पिडितेची जीभ कापल्यामुळे ती काहीच बोलू शकली नाही पण इशाऱ्याने तिने सर्व घटना व आरोपींची नावे पोलीस जबाबात नोंदविली.बलात्कार करणाऱ्यांमध्ये संदीप,लवकुश,रामू,आणि रवि या चार नराधमांची नांवें घेतली आहेत या चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या नराधमांना तात्काळ फाशी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तालुकाध्यक्ष-नविद शेख, शहरध्यक्ष-गुलाम नबी, फयाजखाॅ पठान, अॅड. रज्जाक शेख, शेख कादर जनाब, अशपाक शेख, जमाल शेख, आदी उपस्थित होते…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button