?️ मा आमदार अनिल पाटील यांना ठोस प्रहार परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर तालुक्यातील लोकप्रिय आमदार मा अनिल पाटील यांचा आज वाढदिवस असून कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपला वाढदिवस साजरा न करता जनतेने घरीच राहून शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन त्यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांत चीनच्या सीमेवरील कार्यवायांमुळे भारतीय जवान शहीद झाले आहेत. तसेच अमळनेर शहरात ही 30 लोक मृत्युमुखी पडले आहेत. या पार्श्वभूमीवर आपण वाढदिवस साजरा करणे योग्य नसून महाराष्ट्रात आणि अमळनेर शहरात पसरलेल्या कोरोना रोगाला हरवू आणि नंतर आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरणात वाढदिवस साजरा करू अशा भावना आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

आज पासून 7 दिवस जनता कर्फ्यु सुरू करण्यात आला असून नागरिकांना आवाहन केले आहे की आपण फक्त आवश्यक कामा निमित्ताने च घरा बाहेर पडावे,विनाकारण फिरू नये,घरीच राहून माझ्या साठी आशीर्वाद, शुभेच्छा द्याव्यात,आपणास खरंच काही करायची इच्छा असेल तर कोव्हीड केअर सेंटर येथे रुग्णांसाठी आर्थिक किंवा इतर स्वरूपाची मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.






