Amalner

Amalner: सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात सानेगुरुजी जयंतीनिमित्त अभिवादन

सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात सानेगुरुजी जयंतीनिमित्त अभिवादन

अमळनेर प्रतिनिधी-पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे 24
डिसेंबर पुज्य सानेगुरुजी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सानेगुरुजी वाचनालयाच्या उपाध्यक्षा डॉ प्रा माधुरी भांडारकर यांनी सानेगुरुजी यांच्या प्रतिमेचे पुजन केले. तर जेष्ठ संचालक भिमराव जाधव यांनी माल्यार्पण केले.
सानेगुरुजी साहित्यिक, कवी,आदर्श शिक्षक शिक्षक होते.त्यांचे ग्रंथ, पुस्तके वाचनालयातील वाचकांसाठी ठेवण्यात आले. सानेगुरुजी मातृहृदयी हाडाचे शिक्षक होते. त्यांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे असे मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक वाचनालयाचे संचालक प्रसाद जोशी यांनी केले तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष हेमंत भंडारकर,वाचनालयाचे संचालक ईश्वर महाजन उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सानेगुरुजी वाचनालयाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button