स्वच्छता दूत लोक प्रबोधनकार राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मनसे कडून अभिवादन…
महाराष्ट्राच्या मातीत कर्तृत्ववान, बुद्धीवादी, थोर समाजसेवक, प्रबोधनकार व स्वातंत्र्य प्राप्तीच्या धगधगत्या यज्ञकुंडात समिधा होऊन जळणा-या हुतात्म्याचा त्याग आहे.
राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डाॅ.पंजाबराव देशमुख, प्रबोधनकार ठाकरे या अनेक समाज सुधारकांच्या प्रबोधनाने ही मराठी माती पुनित झाली. तर संत परंपरेतील, चोखोबा, ज्ञानोबा,नामदेव महाराज, एकनाथ महाराज गोराकुंभार इत्यादी संत मालिकेतील या समाजवादी संतांनी सकलजनांच्या दुःख, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मद्वेष परमार्थाचा अवलंब करीत भक्तीभावाने ही गा-हाणी परमेश्वराजवळ सांगत सकल समाजाच्या ऊत्थानासाठी “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग” तत्कालीन समाजीक व्यवस्थेशी लढा देत सांगीतली. हीच परंपरा पूढे पार पाडण्यासाठी गाडगेबाबांनी आपल्या आयुष्याचे हवन केले. स्वच्छता दूत महान समाजसुधारक वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले लोक प्रबोधनकार राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना अमळनेर मनसे तालुकाध्यक्ष संदीप पाटील मनसे शहराध्यक्ष धनु भाऊ साळुंखे तालुका सचिव अरुण गव्हाणे बंगाली फाईल बालवीर व्यायाम शाळा अध्यक्ष सनी भाऊ चव्हाण भुषण पाटील शुभम चौधरी दादू खैरनार जयेश चौधरी राहुल साळुंखे खली बाबा व मनसे सैनिक*????






