रजनीकांत पाटील
अमळनेर :तालुक्यातील गेल्या काही दिवसांपासून बाहेर गावातून येणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणात वाढून गेली आहे. या नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासना मार्फत विशेष खबरदारी घेऊन नागरिकांना वैद्यकीय पथका मार्फत घरी जाऊन शिक्का मारण्यात आला आहे. शिक्का मारलेल्या नागरिकांना घरातच 14 दिवस विलनिकरन करून ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय पथक त्यांच्या संपर्कात राहून त्यांची प्रकृतीची तपासणी करत असते.
मात्र शिरूड परिसरात वेगळीच खळबळ उडाली आहे
शिरूड परिसरात सकाळच्या सुमारास दोन अनोळखी अंगुर विक्री वाल्यांनी आपल्या छोट्या तीन चाकी वाहनांसह गावात प्रवेश केला व गावात अंगुर विक्री करत असताना तो कोठून आला कसा आला याची माहिती न घेता आजूबाजूला गर्दी गोळा झाली.
व खरेदी करत असतांना एक तरुणाची नजर त्याच्या हातावर पडली असता. होम कोरोंटाईन चा शिक्का त्याच्या हातावर दिसला असता. काहीं लोकांनी अंगुर त्याच जागी सोडून निघाले काहींनी त्याला विचारपूस केली असता. तुमी गावात आलात कसे व कोणत्या गावाहून आला आहात अंगुर विक्रेत्याने गावातुन पळ काढला. या बाबत ची खळबळ उडाली व याबाबत चर्चा संपूर्ण गावात परिसरात झाली.






