फैजपुरात श्रीराम पाटील चषकाचे थाटात उद्घाटन
सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल
फैजपूर शहरांत आफताब क्रिकेट अकादमी र्तफे आयोजित श्रीराम पाटील चषकाचे उद्घाटन फैजपुरात थाटात पार पडले.
श्रीराम ग्रुप चे अध्यक्ष श्रीराम पाटील यांच्या हस्ते टूर्नामेंट स्पर्धे चे उद्घाटन झाले तिन दिवसीय स्पर्धेचे अंतिम सामने ६ जानेवारी शुक्रवार रोजी होणार आहेत. सत्कार समारंभात श्रीराम पाटील यांचे सत्कार येथील जफर अली यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी फैजपुर शहराचे माजी प्रभारी नगराध्यक्ष शेख कुरबान, माजी नगरसेवक शेख जफर, वसीम जनाब, फारुक शेख,मुदस्सर नज़र, रियाज भाई, इमरान पटेल यावेळी, उपस्थित होते
जफर अली, शेख मोहसीन,आकीब खान, शेख वकार, इमरान भांजा, शाहरुख बेग,अरशद पिंजारी, यांनी परिश्रम घेतले






