Nashik

शिवकालीन किल्ले, दुर्गाँकडे शासनाचे दुर्लक्ष -छत्रपती संभाजी राजे

शिवकालीन किल्ले, दुर्गाँकडे शासनाचे दुर्लक्ष -छत्रपती संभाजी राजे

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी
डोंगरे वस्तीगृह नाशिक येथे सुरू असलेल्या स्वामी समर्थ जागतिक कृषी निमित्ताने
(ता. २८)दुर्ग संवर्धन अभियानात मार्गदर्शन करताना छत्रपती संभाजी राजे यांनी सांगितले की नाशिक मध्ये जवळपास 40 किल्ले असून याबाबत शासनाकडे किंवा पर्यटन विभागाकडे नोंदी नाहीत मात्र या बाबतीत जनजागृती करून राष्ट्रप्रेमी जबाबदार नागरिक घडवण्याची जबाबदारी घेणारे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे चांगल्या प्रकारचे रयतेचे काम करत असून या कामांमध्ये आम्ही आम्हाला जी शक्य होईल ती मदत देण्यासाठी प्रयत्नशील असून आम्हालाही या ठिकाणी प्रेरणा मिळालीअसून मी लवकरच दिंडोरी दरबारी हजेरी लावणार असून या कामांमध्ये मला जो खारीचा वाटा उचलता येईल तो उचलण्यासाठी मी सदैव तत्पर आहे व विकासाचा मेरू असाच पुढे चालू ठेवा असे छत्रपती संभाजी महाराजांनी प्रसंगी उपस्थित सेवेकऱ्यांना आवाहन केले.

मोबाईल वापरताना काळजी घ्या -सुरज बिजली
माहिती व तंत्रज्ञान सायबर क्राईम या विषयाच्या अनुषंगानेही चर्चासत्र संपन्न झाले.आयटी विभागाच्या विद्यार्थ्यांच्या व भाविकांच्या उपस्थितीत स्वामी समर्थ केंद्र दिंडोरीचे आबासाहेब मोरे यांनी उपस्थितीत तज्ज्ञ व सेवेकऱ्यांचे स्वागत केले.सायबर क्राईम शाखेचे सुरज बिजली,वरिष्ठ पोलीस सायबर विभाग, दामेश मन्सूर, पोलीस निरीक्षक यांनी मार्गदर्शन केले.
सायबर क्षेत्रात काम करणाऱ्या अदिती कैलास पोरजे,नाशिक कृष्णा मुकेश माळी,नंदुरबार,प्रियंका ताई पवार,आंबेजोगाई,प्रज्वल भारत उंदरे व हर्षदा भुसारी अकोला यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिजली यांनी सांगितले की सायबर इंटरनेटचा वापर करताना आपण आपले मोबाईल वरती फोटो लॉक करा तसेच आपल्यापेक्षा इतर कोणी बघणार नाही याबाबत काळजी घ्यावी तसे न केल्यास आपल्या फोटोंना इतर फोटोंबरोबर जॉईन करून गैरवापर होऊ शकतो तसेच सायबर प्रॉडक्ट मध्ये इंटरनेट बँकिंग मोबाईल वरून ओटीपी किंवा इतर ॲप्लिकेशन लोड न करता व ओटीपी कोणाला न देता विना ओळखीची लिंक डाउनलोड न करता आपण आपल्या इंटरनेटचा किंवा मोबाईलचा वापर करावा.तसे न केल्यास सायबर प्रॉडक्ट तसेच सध्या सुरू असलेल्या एमएसईबी लाईट कनेक्शन किंवा तुम्हाला कुठल्यातरी संदेश पाठवणे आमीश दाखवणे,लकी नंबर दाखवणे, प्रलोभन देणे याला बळी न पडता आपण आपली स्वतःची सायबर सिक्युरिटी सांभाळावी.तसेच ई-मेल बँक अकाउंट नाव नंबर अनोळखी इसमाला देणे किंवा अनोळखी लिंक वर टाकणे टाळावे.डीपी फेसबुक व्हाट्सअप यावर आपण आपल्या जबाबदारीने फोटो लॉक करावेत. गुगल हे ॲप्लिकेशन ऑनलाइन व ऑफलाइन दोन्हीही माहिती देऊ शकते. स्वस्त वस्तू मिळते म्हणून आपले नंबर ओटीपी वगैरे किंवा पैसे पाठवणे टाळावे असे आव्हान बिजली यांनी केले.

ओमकार गंधे सायबर सुरक्षा तज्ञ यांनी ब्लूटूथ, व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम याबाबत काळजी घेऊन कॉम्बिनेशन पासवर्ड, सायबर क्राईम साक्षरता या बाबत सतर्कता कशी बाळगावी तसेच नवयुवक मुला-मुलींनी आपले फोटो चुकीच्या पद्धतीने नेटवर टाकल्यानंतर ते आपल्या मोबाईल मध्ये डिलीट होतात परंतु डाटा कायमस्वरूपी तसाच असतो याबाबतही काळजी घ्यावी असे सांगितले. आपले सिम कार्ड कुठूनही डुप्लिकेट तयार करता येऊ शकते यासाठी आधार नंबर ईमेल व ओटीपी,नाव ह देणे टाळावे. चुकीचे ॲप डाऊनलोड करू नये. सायबर माध्यमातून गुन्हेगार पुढे येत असून त्याबाबत आयटीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी तसेच नागरिकांनी खबरदारी बाळगावी.

निलेश पावस्कर यांनी यापूर्वीच्या वक्त्यांनी आपण काय करू नये या संदर्भात माहिती दिली मात्र आपण काय करावे याबाबत मी आपल्याला आव्हान करतो.ग्रामीण भागात सुचलेल्या कल्पनेतून शेतकरी जी वस्तू निर्मिती करतो तिला जुगाड म्हटले जाते. पूर्वीच्या काळात आर्यभट्ट, विश्वमित्र यांनी अशाच प्रकारचे शोध लावले त्यामुळे आपण पंचांग निर्मिती जगाच्या पाठीवर केली. आज भारत पुढे असून तो अशाच प्रकारे पुढे राहणार आहे. यासाठी या ठिकाणी केंद्राच्या वतीने आबासाहेब मोरे नागमणी सर यांचे नेहमी सहकार्य मिळत असून त्याचा आपण सदउपयोग करावा व वेगवेगळे पेटंट तयार करण्यामध्ये आपण अग्रक्रम असावे असे सांगितले.
आबासाहेब मोरे यांनी सांगितलं की केंद्राच्या वतीने आयटी विभाग हा सूर्यासारखा तेजस्वी असून आपण जागृत राहून त्याचा योग्य ठिकाणी वापर केल्यास क्रांती होईल. नेटवर सर्व प्रकारची आध्यात्मिक कृषी विषयक प्रगत तंत्रज्ञान याबाबतची सर्व माहिती उपलब्ध असूनत्याचा उपयोग करून घ्या.आपण माहिती व तंत्रज्ञान किंवा चित्रपटाचा योग्य पद्धतीने आपल्या मनात अनुकरण करण्याची मानसिकता तयार केली तर चांगल्या प्रकारे सुजाण नागरिक घडू शकतो.मराठीतल्या म्हणी प्रमाणे मन चंगा तो काटोठ मे गंगा याचा प्रत्यय येतो.दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्र मार्फत जवळपास दहा हजार केंद्रांमध्ये आम्ही वेगवेगळ्या बचत गटांच्या माध्यमातून व जे जे उपक्रम होतील त्यातून चांगले उपक्रम करून माहिती व तंत्रज्ञान यातून सामान्य माणसाची फसवणूक होणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्नशीलआहोत. सायबर क्राईम मध्ये गुन्हे करणारे गुन्हेगार शोधून काढून कठोर कारवाईसाठी कायदा आणून असे गुन्हे घडणार नाही याबाबत कठोर पावले उचलण्याची गरज असून ती उचलावी अशी विनंती या कार्यशाळेच्या निमित्ताने शासनास मोरे यांनी केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button