पाण्याच्या वनवणीत दोन सख्या बहिणीचा विहरित पडून मृत्यू शासनाने व आश्रमशाळेने मदत करावी – पारधी कुटुंबाची मागणी
शांताराम दुनबळे नाशिक
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील विळवंडी येथे विहरीत पडून दोन सख्या बहिणीचा मृत्यू झाल्याची घडणा घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिंडोरी तालुक्यातील विळवंडी (नाईकवाडी रस्त्या) लगत वास्तव्यास असलेले पारधी परिवार हे अगदी आनंदानी राहत होते. पण पारधी परिवारास कुनाची नजर लागली की असा विपरीत प्रकार घडला. यात पदमा उत्तम पारधी इयत्ता 5 वी , फशाबाई उत्तम पारधी इयत्ता 4 थी मध्ये शिकत होत्या. त्रंबकेश्वर तालुक्यातील रोहिलेगाव आश्रमशाळे मध्ये या दोन बहिणी शिकायला होत्या. या आश्रमशाळेत एडिमशन घेतले होते, परंतु शाळा चांगल्या रीतीने चालू नव्हत्या या कारणाने घरी म्हणजे गांव विळवंडी तालुका दिंडोरी जि.नाशिक येथे होत्या. हे कुटुंब गावापासुन 1 km अंतरावर शेतीवस्तित रहायला होते. या परिसरात पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई आहे. ही टंचाई गेल्या खूप वर्ष्यापासून आहे.याकडे कोणीही लोकप्रतीधिनी लक्ष देत नाही. अक्षरशः गढूळ पाणी प्यावे लागत आहे. शनिवारी सकाळी ठीक 7 वाजता या दोन बहिणी दर दिवषीप्रमाणे पाणी आणण्यासाठी विहरिवर गेल्या असता, दर दिवशी प्रमाणे या मुलींनी पाणी काढत असताना एका बहिणीचा पाय घसरला व विहरत पडली. आपली बहीण विहरत पडली हे बघून दुसऱ्या बहिणीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु यात त्या आपला जीव वाचवण्यासाठी अयशस्वी ठरल्या. व काळाने घाला घातला.यात त्या दोन्ही बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यावेळी दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व हवालदार घटनास्थळी दाखल झाले. व दोनही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्या दोन्ही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याचे सांगितले. 15 दिवसांपासून याच परिवारातील एक मुलगी आजाराने मयत पावली होती. पारधी परिवारावर 15 दिवसात हे 3 रे संकट आहे. या संकटातून बाहेर पडावे कुठे तर हा प्रकार घडला. वडील उत्तम पारधी हे आपला परिवार चालवण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात मजुरी करत असे. आता हा असा प्रकार घडला आहे त्यात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आता मदत देते का कुणी मदत अशी वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. दिंडोरी तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून इथे या तालुक्याला विधानसभेचे अध्यक्षपद देखील मिळाले आहे.परंतु एकीकडे बघता हे असे प्रकार घडत आहे.येथील नागरिकांना, महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते आहे. दुसऱ्याच्या विहरीतून पाणी आणावे लागते. त्यात असा हा विपरीत प्रकार घडला आहे. या भागात लोकप्रतिनिधी फक्त मतदान असेल तेव्हाच येतात मतदान झाले की कुणी ढुंकून सुद्धा बघत नाही. असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे. लवकरात लवकर शासनाने मदत करावी अशी मागणी मुलींच्या नातेवाईकांडून केली जात आहे. या प्रकाराची दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कलपेशकुमार चव्हाण व पोलीस हवालदार हे करत आहे.






