कोरोनाच्या पाश्वभुमीवर विलास यशवंतराव पाटील व ज्ञानाई गुरुकुल यांच्या तर्फ आर्सेनिक आल्बम 30 CH या औषधाचे मोफत वाटप
प्रतिनिधी मुबारक तडवी मोठा वाघोदा तालुका रावेर
मोठा वाघोदा.ता.रावेर/- कोरोना मुळे झालेल्या लाॅकडाऊन च्या काळात परिस्थितिचे गांभीर्य लक्षात घेत शासनाच्या भरवशावर अवलंबून न बसता विलास यशवंतराव पाटील व ज्ञानाई गुरुकुल यांनी स्व:तच्या खर्चावर आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनानुसार कोरोना प्रतिबंधक होम्योपॅथिक औषध (आर्सेनिक आल्बम 30 CH) चे मोफत वाटप करण्याचे ठरवीले व डॉ.सौ.मयुरी अविनाश भोलाणे (BHMS) यांच्या मार्गदर्शनाने सकाळी 11 ते 2 या वेळेत रेखाविलास एन्टरप्रायजेस, स्वामीनारायण संकुल, रावेर रोड, सावदा येथे दिनांक:- 24 मे 2020 पासुन गोळ्यांची वाटप सुरू केली आहे. तरी 26 मे पर्यंत ज्ञानाई गुरुकुल कडुन 4345 पॅकेट्सचे वाटप करण्यात आले आहे. त्यातुन गुरुकुलाने 55 गावातील 23000 लोकांनपर्यंत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सेवा पुरवली आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक पॅकीट मधे 8 ते 10 लोकांना पुरेल इतक्या औषधीच्या गोळ्या आहेत. तरी लोकांना औषध मोफत मिळावे यासाठी गुरुकुल परीवार दुपारी वाटप झाल्यावर दुसर्या दिवसाच्या वाटपासाठी लागणार्या गोळ्या बनवुन त्यांचे पॅकींग चे काम करतात. यात प्रत्यक्ष प्रमाणे चंद्रकांत वामनराव भोलाणे, सागर विलासराव पाटील, गौरव अशोक भंगाळे, किरण लक्ष्मण कुंभार, अमित लतेश वाणी, गणेश सरोदे, मयुर प्रभाकर चौधरी, खगेंद्र रमेश बेंडाळे, निखिल चंपालाल कुमावत, राहुल दत्तात्रय नेमाडे, नचिकेत चंद्रकांत भोलाणे, आसिम शेख, अनिकेत संजय पाटील, मयुर संतोष कुमावत, निकेत प्रकाशसिंह परदेशी, मनिष अनिल महाजन हे सर्व गुरुकुल परीवार कोणत्याही शासकीय, राजकीय सहकार्य न घेता मिळुन निस्वार्थ सेवा कार्य करीत आहेत






