चाळीसगाव पासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंझर गावात फवारणी
बहाळ करमूड ज़िल्हा परिषद गटातील कुंझर हे गाव या गावातील व्हाट्स अप ग्रुप वर चाटटींग मध्ये असे म्हटलं गेले की अनेक गावात फवारणी सुरु असताना
प्रतिनिधी मनोज भोसले
कोणताही राजकीय पुढारी आपल्या कडे लक्ष देत नाही अशी चर्चा झाली ही माहिती आमदार मंगेश दादा चव्हाण व दिनेश भाऊ बोरसे मित्र मंडळ यांचे पर्यंत गेली त्यांनी लगेच फवारणी साठी औषध व ट्रॅक्टर, गन, फवारणी माणसं, मास्क, ग्लोव्हस कुंझर ला पाठवले सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच रमेश नाना गढरी, भगवान महाजन, वाल्मिक महाले,वीरभन तात्या, चंद्रभान अप्पा, संजय चित्ते, सोमनाथ पाटील, जिभाऊ मराठे समाधान ठाकरे, यांचे सहकार्य ने दिनांक 7/4/2020, व 8/4/2020 असे दोन दिवसात फवारणी केली बहाळ येथून कैलास भाऊ शिंपी, प्रमोद अण्णा पाटील, पिंटू भाऊ महाजन, असिफ दादा मन्यार, पंकज महाजन यांचे सहकार्य लाभले. ग्रामसेवक, पोलीस पाटील, गावातील अनेक तरुण मित्रानी स्वतः मदत केली.
दिनेश भाऊ मित्र मंडळाच्या सर्व सदस्य नी आतापर्यंत वडाळा वडाळी, टेकवाडे, बहाळ रथाचे, कसबे, दसकेबर्डी, खेडी खुर्द, पोहरा, अभोणा,तसेच खेडगाव, रहिपुरी, नाव्हे या गावी लवकरच फवारणी होणार असल्याचे सांगितले.
Corona मुक्ती साठी स्व खर्च करून पुण्याचं काम करीत असल्याबद्दल दिनेश भाऊ बोरसे मित्र मंडळ व सर्व टीम चे अभिनंदन करण्यात येत आहे.






