sawada

स्वतंत्र दिना निमित्त शहीद अब्दुल हमीद स्मारक वर पुष्प चक्र अर्पण

स्वतंत्र दिना निमित्त शहीद अब्दुल हमीद स्मारक वर पुष्प चक्र अर्पण

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

देशाला स्वातंत्र्य मिळवण्या कामी येथील प्रत्येक जाती धर्मातील लोकांनी त्यांच्या जीवाची काडी मात्र चिंता न करता त्या वेळी फीरंगी सरकार च्या गुलामीतुन देशाला आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वतंत्र मिळवून दिले . महणुन आपण सर्व देश वासि 15 ऑगस्ट हा दिवस मोठ्या व उत्कृष्ठ पणे उत्साहाने विविध कार्यक्रम घेऊन संपुर्ण जगाला हेवा वाटेल अश्या गाजा बाज्या ने स्वतंत्र दिवस साजरा करतात.
परंतु कोरोना महामारी मुळे सरकारने घालून दिलेले नियम अटी ला बांधिल राहुन सामाजिक, संस्कृतीक राजकीय कार्यक्रम सर्व जाती धर्माचे विविध सण उत्सव तसेच व्यवसाय बंद पडल्याने लोकांच्या रोजी रोटी चे मार्ग सुध्दा ठप्प झाले .

देशातील सर्व शाळा कालेज ,सरकारी व निम सरकारी कार्यालय सहित गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत प्रथमच बोटा वर मोजले जाईल इतक्या मान्य वरांचया उपस्थित यंदाचा ध्वजारोहण साजरा करण्यात आला.याची खंत देशवासियांचया मनात राहिल.
परिणामी सावदा येथे नगर पालिका, पोलिस स्टेशन , सर्व उर्दू मराठी शाळा, बॅंक,महावितरण विभाग येथे ध्वजारोहण करण्यात येवुन शेखपुरा भागात बांधलेले ऐतिहासिक शहीद अब्दुल हमीद स्मारक वर स्वतंत्र दिना च्या निमित्ताने पुष्प चक्र मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. त्या वेळी न.पा.चे मुख्याधिकारी सौरभ जोशी ,विरोधी गटनेते फिरोज खान पठाण, नगरसेवक राजेश वानखेडे, अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी, अललाह बखश , नंदा ताई लोखंडे, मिनाक्षी कोल्हे, सहायक पोलिस अधिकारी राजेंद्र पवार साहेब, समाज सेवक शेख फरीद शेख नुरोद्दिन,शहीद अब्दुल हमीद सोसायटीचे अध्यक्ष शेख मुख्तार, फीरोज खान, शेख जावीद ,शेख हुसैन, व इत्यादी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button