महा इ सेवा केंद्रात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न ….
सुनिल घुमरे नाशिक
दर वर्षीप्रमाणे याही वर्षी स्वतंत्र दिनानिमित्त महा इ सेवा केंद्र ( सेतू कार्यालय) पवननगर येथे ध्वजारोहण व कोरोना महामारी आजाराच्या अनुषंगाने मास्क व आयुर्वेदिक काढा यांचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी परिसरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील यतलवार यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमास विविध भागांतील केंद्र संचालक अनुक्रमे रवींद्रकुमार गायकवाड,रविंद खैरे,सुनील सोनवणे,,नारायण जाचक, हरिता देवरे,मयूर शर्मा,मनोज पुरकर, राजाभाऊ कपाळे,सुभाष चिरमाळे,चेतन देवरे प्रशांत इंगोले आदी उपस्थित होते यावेळी परिसरातील नागरिकांना मास्क आणि आयुवेर्दीक काढयाचे वाटप सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन प्रास्ताविक व सुत्रसंचलन केंद्रासंचालक अनिल आठवले यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील आठवले, भगवान निकाळजे,अनिल कलंके,मनोज मुंढे ,साहिल गायकवाड,छोटू नेरकर,हेमंत बावा, पोपट आहिरे,राजा जैस्वाल,अंकुश साळवे,सौरभ कासार, आदींनी परिश्रम घेतले तर आभार प्रदर्शन सुनील आठवले यांनी मानले.






