मुस्लिम तब्लिकी जमात च्या भावना दुखावल्या प्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला
फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी
देशावर कोरोना या विषाणूंच्या प्रादुर्भावाने मोठे संकट आजरोजी निर्माण झाले असून संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन सुरू असून, अशा कठीण प्रसंगी हजरत निजामुद्दीन मरकज मुस्लिम समाजाचा तबलीक जमातचा धार्मिक कार्यक्रमासाठी काही नागरिक दिल्ली येथे अडकले होते. परंतु, काही प्रसार माध्यमे दररोज तबलीक जमात बद्दल व मौलाना साद साहब यांच्या बद्दल अत्यंत अपमानास्पद बदनामी करीत असल्याने अश्या प्रसार माध्यमावर कडक कार्यवाही करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन येथील सामूहिक प्रतिष्टीत मुस्लिम समाज्याच्या वतीने फैजपूर पोलीस स्टेशनला देण्यात आले.
सर्व जग कोरोनाने होरपळून निघत आहे. प्रत्येकाच्या मनात धास्ती आहे ती कोरोना या संसर्गजन्य विषाणूंची. आपल्या देशावर सुद्धा कोरोना या विषाणूंच्या प्रादुर्भावाने मोठे संकट आजरोजी निर्माण झाले असून संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन सुरू आहे. अशा कठीण प्रसंगी हजरत निजामुद्दीन मरकज मुस्लिम समाजाचा तबलीक जमातचा धार्मिक कार्यक्रमासाठी काही नागरिक दिल्ली येथे अडकले होते. परंतु, काही प्रसार माध्यमातून दररोज तबलीक जमात बद्दल व मौलाना साद साहब यांच्या बद्दल अत्यंत अपमानास्पद बदनामी करीत चुकीचे शब्दाचा वापर करीत आहे.
कोरोना जिहाद, तालिबानी, आतंकवादी, विरुधी कृती करणारे असे दर्शवण्याचे काम तबलीक जमात करीत आहे. तसेच संपूर्ण मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे व धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न काही प्रसार माध्यम करीत आहे. अश्या प्रसार माध्यमांच्या अँकर व एडिटर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे. अश्या मागणीचे निवेदन फैजपूर येथील सामूहिक प्रतिष्टीत मुस्लिम समाज्याच्या वतीने फैजपुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांना देण्यात आले. या निवेदनावर नगरसेवक शेख कुर्बान, कलीम खा मण्यार, कौसर अली, शकील शेख (सेवा निवृत्त ASI), आवेश भांजा, अलीम सौदी आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.






