Maharashtra

शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षण रक्कम तात्काळ मिळावी, रावेर युवासेनेचे तालुका अध्यक्ष प्रविण पंडित यांची मागणी

शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षण रक्कम तात्काळ मिळावी, रावेर युवासेनेचे तालुका अध्यक्ष प्रविण पंडित यांची मागणी

प्रतिनिधी विलास थाटे

जे शेतकरी पीकविमा पात्र झालेले आहेत त्यांची पीकविमा संरक्षण रक्कम लवकरात लवकर मिळावी या विषयाचे निवेदन रावेर तालुका युवासेना तालुकाप्रमुख प्रवीण पंडित व युवासेना उपतालुका प्रमुख तुषार कचरे यांनी मुख्यमंत्री , कृषीमंत्री , जळगांव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील , आमदार चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

जळगाव जिल्यातील शेतकरी प्रचंड अडचणींना सामोरे जात असताना , त्यांना देशावर आलेल्या या महाभयंकर कोरोना महामारीचा सामना करत असताना त्यांना अनेक अडचणी येत आहेत..

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची केळी मातीमोल भावात विकली जात तर आहेच त्यांनी केळीला लावलेला खर्चही निघू शकत नाहीय तसेच त्यांच्या अन्य पिकांनाही योग्य तो भाव मिळत नसल्याने शेतकरी प्रचंड निराशाजनक व तणावात आलेले आहेत , पाऊसही वेळेवर पडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट आलेले आहे.

म्हणून आम्ही जळगाव जिल्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने आपणास विनंती करतो की, जे शेतकरी पीकविमा पात्रता धारक आहेत त्यांना पीकविमाची रक्कम लवकरात लवकर मिळावी जेणेकरून जो अवघ्या जगाचा पोशिंदा आहे शेतकरी राजा त्यांच्या हक्काची असलेली रक्कम त्यांना लवकरात लवकर मिळावी व आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी राज्याला आपण या कोरोना महामारीच्या काळात उभं करावं अशी अपेक्षा करतो.

महाराष्ट्र राज्यातील सरकार शेतकऱ्यांसाठी सदैव तत्पर असतांना मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून नक्कीच जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची असलेली पीकविमा संरक्षण रक्कम लवकरात लवकर मिळेल अशी खात्री युवासेना तालुका प्रमुख प्रवीण पंडित व युवासेना उपतालुका प्रमुख तुषार कचरे यांनी व्यक्त केली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button